ऑस्ट्रोलिया : जेव्हापासून करोनाचा (Coronavirus Pandemic) भयंकर काळ सुरु झाला तेव्हापासून ऑफिस बंद होऊन सगळं काही ऑनलाईन सुरू झालं आहे. घरुन काम (Work from home) करण्याची संधी मिळत असल्यामुळे सुरुवातीला लोकांना मज्जा आली. पण ऑनलाईन कामामुळे आता सगळेच वैतागले आहेत. अशात अनेक वेळा ऑनलाईन काम सुरु असताना आपण ऑडिओ आणि व्हिडिओ बंद करण्याचं विसरून जातो. याचाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकवत असताना शिक्षकाने असं काही दाखवलं की संपूर्ण शाळेत खळबळ उडाली आहे. अलीकडेच, ऑस्ट्रेलियात हा प्रकार समोर आला आहे. इथे वेस्टर्न सिडनी विद्यापीठातील एका प्राध्यापकाने चुकून मुलांसमोर झूम कॉलवर आश्चर्यकारक गोष्ट दाखवली. डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, विद्यापीठातील एक प्राध्यापक झूम कॉलवर क्लास घेत होते. बराच वेळ शिकवल्यानंतर एका प्राध्यापकाने काही काळ विश्रांती घेण्याचे ठरवले. पण ब्रेक घेताना त्यांनी प्रेझेंटेशन आणि कॅमेराही बंद केला नव्हता.

canada accident : मोठी दुर्घटना!, कॅनडामध्ये अपघातात ५ भारतीय विद्यार्थी ठार, २ जखमी
ब्रेक सुरू असतानाच अचानक एक अश्लिल वेबसाइट स्क्रिनवर उघडली गेली. ज्यामध्ये काही अश्लिल व्हिडिओ दिसत होते. प्रेझेंटेशनचा पर्याय सुरू असल्यामुळे हे सगळं स्क्रीनवर विद्यार्थ्यांना दिसत होतं. हे सर्व पाहून सर्वांनाच धक्का बसला. मिळालेल्या माहितीनुसार, या सगळ्या प्रकारामुळे शाळेत चर्चांना उधाण आलं होतं. तर या प्रकारामुळे संबंधित प्राध्यापकांना कामावरून काढून टाकण्यात आलं.

PM Imran Khan: भारताकडून ‘चुकून’ पाकिस्तानात पडलेल्या क्षेपणास्त्रावर पंतप्रधान इम्रान खान म्हणतात…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here