पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आपल्याविरुद्ध अविश्वास ठराव मांडणाऱ्या विरोधी पक्षाला निशाण्यावर घेतलंय. मात्र, विरोधकांवर टीका करणाऱ्या इम्रान खान यांच्या एका वादग्रस्त वक्तव्यानंतर ते स्वत:च सामान्यांच्या टीकेचे धनी ठरलेत.
‘बटाटे आणि टोमॅटोच्या किंमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी मी राजकारणात प्रवेश केलेला नाही’ असं वक्तव्य पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी केलंय. ते पंजाब प्रांतातील हाफिजाबादमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका राजकीय जाहीर सभेत बोलत होते.
धन आणि बळाच्या जोरावर सरकार पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या तत्वांविरुद्ध देश उभा राहील, अशी आशाही पंतप्रधान इम्रान खान यांनी आपल्या भाषणात व्यक्त केली.
आपल्या सरकारद्वारे घोषित करण्यात आलेल्या योजनांचे परिणाम लवकरच समोर येतील आणि त्यातून आपल्या उर्वारित कार्यकाळात पाकिस्तान एक महान राष्ट्र बनण्याकडे वाटचाल करत स्पष्ट होईल, असं वक्तव्यही इम्रान खान यांनी केलं.
क्रिकेटच्या मैदानातून राजकीय मैदानात उडी मारणाऱ्या पंतप्रधान खान यांनी आपण देशातल्या तरुणांसाठी राजकारणात प्रवेश केल्याचं सांगितलं. एखादी व्यक्ती जे स्वप्न पाहतो ते सगळं आपल्या आयुष्यात अगोदरपासूनच आहे. त्यामुळे राजकारणात येण्यात आपला कोणताही वैयक्तिक स्वार्थ नसल्याचंही इम्रान खान यांचं म्हटलं.
‘बटाटे आणि टोमॅटोचे भाव जाणून घेण्यासाठी मी राजकारणात उतरलो नाही. देशातील तरुणांच्या हितासाठी मी राजकारणात प्रवेश केला आहे. जर आपल्याला महान राष्ट्र बनायचं असेल, तर सत्याला साथ द्यायला हवी आणि गेल्या २५ वर्षांपासून मी हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय’ असंही सत्ताधारी पाकिस्तान तहरिक-ए-इन्साफ पक्षाचे अध्यक्ष इम्रान खान यांनी म्हटलंय.
Very interesting information! Perfect just what I was looking for! My site: Most Used Blackjack Counting Systems