औरंगाबाद : शहरातील आमखास मैदानावर आज ( सोमवारी ) होणारी वंचित बहुजन आघाडी आणि मुस्लिम इत्तेहाद फ्रंट यांची जाहीर सभा होणार नसून ही सभा पुढे ढकलण्यात आली असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते फारूक अहमद यांनी सांगितले आहे. तसेच या सभेला उपस्थित राहणाऱ्या कर्नाटक येथील हिजाब गर्ल मुस्कान खानला सुद्धा कर्नाटक पोलिसांनी नजरकैदत ठेवलं असल्याचं सुद्धा वंचितकडून सांगण्यात आले आहे.

औरंगाबाद इथे आज वंचित बहूजन आघाडी आणि मुस्लिम इत्तेहाद फ्रंट यांची शहरातील अमखास मैदानावर जाहीर सभा होणार होती. तर या कार्यक्रमाला कर्नाटक येथील मुस्कान खान सुद्धा उपस्थित राहणार होते.मात्र काल रात्री पोलिसांनी या कार्यक्रमाची परवानगी नाकारली आहे. त्यामुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला असल्याची माहिती वंचित बहूजन आघाडीकडून देण्यात आली आहे.

महावितरणच्या कार्यालयातच शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न; जिल्ह्यात तणाव!
मुस्कानला कर्नाटक पोलिसांकडून नजरकैद…

तसेच या कार्यक्रमात कर्नाटक येथील मुस्कान खान सुद्धा उपस्थित राहणार होती. मात्र भाजपने तिच्या उपस्थितीला विरोध करत रस्त्यावर उतरण्याची धमकी दिली होती. दरम्यान औरंगाबाद शहर पोलिसांनी मुस्कान खानला नोटीस पाठवली असून शहरात प्रवेश बंदी केली आहे. तर कर्नाटक पोलिसांच्या मदतीने औरंगाबाद शहर पोलिसांनी मुस्कान शेखला नजरकैदेत ठेवलं असल्याचा आरोपही वंचीतकडून करण्यात आला आहे.

‘हिजाब गर्ल’वरून राजकारण पेटलं; वंचित आघाडीच्या सभेची परवानगीही नाकारली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here