parbhani news today live: घरातल्यांनी पैशावरुन घातला वाद, रागाच्या भरात १८ वर्षीय युवकाचं टोकाचं पाऊल – parbhani news an 18 year-old man committed suicide out of anger
परभणी : परभणी शहरातील कृष्णा नगर इथे घरामध्ये पैशाच्या कारणावरुन झालेल्या वादामुळे सय्यद सोहेल सय्यद गौस वय १८ वर्ष या युवकाने पारवा गेट इथं रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना रविवार १३ मार्च रोजी दुपारी तीन वाजता घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १४ मार्च रोजी तरुणाची ओळख पटली आणि त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात आत्महत्येची नोंद करण्यात आली आहे. परभणी शहरातील कृषी नगर इथं सय्यद सोहेल सय्यद गौस वय १८ वर्ष यांच्या घरात पैशाच्या कारणावरुन कुटूंबासोबत सकाळी अकरा वाजता वाद झाला. ऑनलाईन क्लास सुरू असताना प्राध्यापकांनी केलं धक्कादायक कृत्य, स्क्रिनवर थेट दिसलं… काम का करत नाहीस, अशी विचारणा सोहेल याला कुटूंबीयांनी केली. त्यामुळे सोहेल रागाच्या भरात घराबाहेर पडला. त्याने पारवा गेटवर रविवार १३ मार्च रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास आत्महत्या केली. कोतवाली पोलिसांना पारवा गेटवर युवकाचा मृतदेह असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, मृतदेह ताब्यात घेऊन जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आला. सय्यद सोहेलच्या नातेवाईकांना सोमवार १४ मार्च रोजी अंगावरील कपड्यावरुन आणि चप्पलवरुन त्याला ओळखले. यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला आहे.
या प्रकरणी सय्यद गौस यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर तुरनर, पोकाँ. विशाल गायकवाड करत आहेत.