रियाध, सौदी अरेबिया :

सौदी अरेबमध्ये दहशतवाद प्रकरणाशी निगडीत तब्बल ८१ जणांना एकाच दिवशी फासावर चढवण्यात आल्याचं समोर येतंय. उल्लेखनीय म्हणजे, हा आकडा गेल्या वर्षभरातील देहदंडाची शिक्षा फर्मावण्यात आलेल्या एकूण गुन्हेगारांच्या संख्येइतका आहे.

सौदी प्रेस एजन्सीनं दिलेल्या माहितीनुसार, हे सर्व गुन्हेगार वेगवेगळ्या घृणास्पद गुन्ह्यांत दोषी आढळले होते. तसंच यातील अनेक दोषी इस्लामिक स्टेट, अलकायदा, हुती विद्रोही संघटना आणि अशाच इतर काही दहशतवादी संघटनांशी निगडीत होते.

ज्या व्यक्तींना फासावर चढवण्यात आलं ते सौदी अरबमध्ये दहशतवादी हल्ले घडवून आणण्याच्या योजना आखत होते. यामध्ये मोठ्या संख्येत सामान्य नागरिकांची हत्या आणि सुरक्षा दलावर हल्ल्याचा कट रचणं अशा गुन्ह्यांचाही समावेश होता. तसंच हे दोषी सरकारी कर्मचारी आणि महत्त्वपूर्ण आर्थिक संस्थांना निशाण्यावर घेण्याचा कट आखत होते, असंही एजन्सीनं म्हटलंय.

Imran Khan: ‘बटाटे-टोमॅटोच्या किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी राजकारणात आलेलो नाही’
Barack Obama: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा करोना संक्रमित
या गुन्हेगारांवर कायदे प्रवर्तन अधिकारी, पोलीस वाहनं यांना भूसुरुंगाच्या साहाय्यानं स्फोटात उडवणे, अपहरण, अत्याचार, बलात्कार, तस्करी, शस्त्रास्त्र बाळगणं आणि बॉम्बस्फोट असे वेगवेगळे गुन्हे दाखल होते.

फासावर चढवण्यात आलेल्या ८१ जणांत ७३ सौदी नागरिक, सात येमेनी आणि एका सीरियाचा नागरिकाचा समावेश आहे. या सर्वांवर सौदी न्यायालयात खटले चालवले गेले आणि १३ न्यायाधीशांनी या प्रकरणांची देखरेख केली.

सौदी सरकार दहशतवादाविरोधात अशाच पद्धतीनं कठोर निर्णय भविष्यातही घेत राहील, असंही एजन्सीनं म्हटलंय.

उल्लेखनीय म्हणजे, विविध प्रकरणांमध्ये दोषी ठरलेल्या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा देण्यात आखाती देश आघाडीवर आहेत. या देशांत बऱ्याचदा गुन्हेगाराचा शिरच्छेद करण्याचीही शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. मानवाधिकार संघटना आणि अनेक पाश्चिमात्य देशांकडून यासाठी आखाती देशांवर टीका केली जाते.

Volodymyr Zelensky: झेलेन्स्कींनी रुग्णालयात जाऊन घेतली जखमींची भेट, ‘नाटो’ला पुन्हा चुचकारलं
PM Imran Khan: भारताकडून ‘चुकून’ पाकिस्तानात पडलेल्या क्षेपणास्त्रावर पंतप्रधान इम्रान खान म्हणतात…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here