वृत्तसंस्था, कीव्ह :

रशिया आणि युक्रेन यांच्यातील चर्चेची चौथी फेरी सोमवारी स्थगित करण्यात आली असून, आज मंगळवारीदेखील दोन्ही देशांत चर्चा होणार आहे, अशी माहिती युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झिल्येन्स्की यांचे सहकारी मिखाइल पोडोल्याक यांनी सोमवारी दिली.

‘चर्चेला मंगळवारपर्यंत तांत्रिक स्थगिती घेण्यात आली आहे. कार्यकारी उपगटांमधील अतिरिक्त काम करण्यासाठी ही स्थगिती घेण्यात आली आहे. वाटाघाटी चालू आहेत,’ असे पोडोल्याक यांनी ट्विटरद्वारे सांगितले.

चर्चेदरम्यान युक्रेनने तातडीने शस्त्रसंधीची मागणी केली. युक्रेनच्या शिष्टमंडळाने थेट रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांच्याशी चर्चेची मागणी केली आहे. कीव्हमध्ये उपस्थित असलेल्या युक्रेनच्या शिष्टमंडळासोबत दूरदृश्य प्रणालीद्वारे चर्चेची ही चौथी फेरी झाली. दोन्ही देशांतील वाटाघाटी ही एक ‘कठीण चर्चा’ असल्याचे युक्रेनचे अध्यक्ष झिल्येन्स्की यांनी सोमवारी सांगितले. ‘कठीण चर्चा सुरू आहे. प्रत्येक जण बातमीची वाट पाहत आहे. या संध्याकाळी आम्ही चर्चेच्या निष्पत्तीबाबत सांगू,’ असे झिल्येन्की यांनी व्हिडिओ संदेशात म्हटले होते.

Imran Khan: ‘बटाटे-टोमॅटोच्या किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी राजकारणात आलेलो नाही’
PM Imran Khan: भारताकडून ‘चुकून’ पाकिस्तानात पडलेल्या क्षेपणास्त्रावर पंतप्रधान इम्रान खान म्हणतात…
रशिया व युक्रेनमधील चर्चेची पहिली फेरी बेलारूसमधील गोमेल प्रांतात २८ फेब्रुवारीला झाली होती. चर्चेची दुसरी फेरी बेलारूसमध्येच तीन मार्चला झाली होती. त्यानंतर रशिया व युक्रेनच्या शिष्टमंडळांतील चर्चेची तिसरी फेरी बेलारूसमध्ये सात मार्चला झाली होती. युक्रेनच्या दन्येत्स्क व लुहान्स्क या दोन प्रांतांना रशियाने स्वतंत्र देश जाहीर केले होते. त्यानंतर २४ फेब्रुवारीला रशियाने युक्रेनवर हल्ले सुरू केले होते.

युक्रेनमधील आक्रमणाला रशियाने विशेष लष्करी मोहीम म्हटले आहे. यामध्ये केवळ लष्करी ठिकाणे लक्ष्य केली जातील. नागरिकांना कोणताही धोका नसेल, असा दावा रशियाने केला होता; मात्र, पाश्चिमात्य देशांनी रशियाचे दावे फेटाळून, या देशावर निर्बंध लादले. रशियाच्या आक्रमणाला पाठिंबा देणाऱ्या बेलारूसवरही निर्बंध लादण्यात आले आहेत.

रशियाला चीनची मदत?; लष्करी उपकरणे मिळवण्याचा प्रयत्न असल्याचा अमेरिकेचा आरोप
सौदीत एकाच दिवशी ८१ कैद्यांना फाशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here