बाबा घरी एकटे आहेत-
१ मिनिट आणि २५ सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये सलमान स्वतःची आणि निर्वानची ओळख सांगतो. यानंतर तो म्हणतो की, ‘आम्ही काही दिवसांसाठी इथे आलो होतो. पण आता इथेच राहत आहोत. आम्ही तर घाबरलो आहोत. निर्वान सोहेबचा मुलगा आहे.’ यानंतर सलमान निर्वानला त्याने किती दिवस त्याच्या बाबांना पाहिलं नाही असा प्रश्न विचारला. यावर निर्वानने तीन आठवड्यांपासून बाबांना पाहिलं नसल्याचं सांगितलं. यानंतर सलमाननेही त्याच्या वडिलांना तीन आठवड्यांपासून पाहिलं नसल्याचं सांगितलं.
‘घरात राहण्यातच लोकांचं भलं आहे’
व्हिडिओमध्ये सलमान निर्वानला अजून एक प्रश्न विचारतो. जो डर गया समझो मर गया हा डायलॉग माहीत आहे का या प्रश्नावर निर्वाण होकारार्थी मान डोलावतो. यानंतर सलमान म्हणतो की, ‘पण हा डायलॉग इथे चालत नाही. आम्ही घाबरलो आहोत आणि मोठ्या हिंम्मतीने आम्ही हे मान्य करत आहोत.’ एवढंच नाही तर निर्वानला या सगळ्याबद्दल काय वाटतं असं सलमान विचारतो. यावर निर्वानने सर्वांनी आपल्या घरात रहावं आणि सोशल डिस्टन्सिंग ठेवावं. कारण तेव्हाच या सर्व गोष्टी लवकर संपतील असं उत्तर दिलं.
‘जो डर गया वो मर गया’
व्हिडिओच्या शेवटी म्हणतो की, ‘या सर्व गोष्टीचं तात्पर्य हे आहे की, जो घाबरला तो वाचला आणि त्याने अनेकांचं आयुष्यही वाचवलं.’ सलमान खानचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत असून लाखांहून जास्त व्ह्यूज या व्हिडिओला मिळाले आहेत.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times