Authored by Edited by टीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: Mar 15, 2022, 11:59 AM

Nawab Malik | उच्च न्यायालयाने याचिका फेटाळणे हा नवाब मलिक यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. यामुळे नवाब मलिक यांचा तुरुंगातील मुक्काम बराच लांबू शकतो.

 

Nawab Malik (1)
Nawab Malik: नवाब मलिक यांची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली.

हायलाइट्स:

  • हेबियस कॉर्पस याचिकेतील अंतरिम सुटकेचा विनंती अर्ज न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे व न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांच्या खंडपीठाने फेटाळला
  • नवाब मलिक यांच्यासाठी मोठा धक्का
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांनी मुंबई उच्च न्यायालयात ‘ईडी’च्या कारवाईविरोधात केलेली याचिका फेटाळून लावण्यात आली आहे. ईडीने केलेली अटक कारवाई आणि त्यानंतर विशेष पीएमएलए कोर्टाने सुनावलेला कोठडी आदेश बेकायदा असल्याचा दावा करत दाखल केलेल्या हेबियस कॉर्पस याचिकेतील अंतरिम सुटकेचा विनंती अर्ज न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे व न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांच्या खंडपीठाने फेटाळला. हा नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. (Bombay HC refuses to direct interim release of Maharashtra Cabinet Minister Nawab Malik in a money laundering case of Enforcement Direcrorate)

नवाब मलिक २३ फेब्रुवारीपासून ईडीच्या ताब्यात आहेत. कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्याशी आर्थिक व्यवहार केल्याप्रकरणी ईडीने नवाब मलिक यांना अटक केली होती. दरम्यानच्या काळात नवाब मलिक यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत झाली होती. यानंतर नवाब मलिक यांच्याकडून ईडीच्या कारवाईविरोधात उच्च न्यायालयात दाद मागण्यात आली. अटक आणि कोठडी आदेश बेकायदा असल्याचे नवाब मलिक यांनी याचिकेत म्हटले होते. तसेच हेबियस कॉर्पस याचिका करून त्यात अंतरिम सुटकेची विनंतीही नवाब मलिक यांनी केली होती. परंतु, न्यायालयाने त्यांची ही विनंती फेटाळून लावली आहे. ईडीकडून झालेली अटक कारवाई बेकायदा असल्याचा मलिक यांचा दावा चुकीचा आहे. तसेच ईडीची कारवाई कायद्याला धरूनच आहे, असे निरीक्षण खंडपीठाने नोंदवले. नवाब मलिक यांना कायद्याप्रमाणे नियमित जामिनासाठी अर्ज करण्याचा पर्याय उपलब्ध आहे, असे हायकोर्टाने न्यायालयात स्पष्ट केले आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : bombay high court refuses nawab malik plea against ed enforcement direcrorate
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here