रत्नागिरी: रत्नागिरीतील पावस काझीवाडा येथील आंबा बागेत राखणदार असलेल्या ६८ वर्षीय वृद्धाचा खाडीत बुडून मृत्यू झाल्याची घटना काल, सोमवारी उघडकीस आली आहे. आदल्या रात्री ही घटना घडली. पाण्यात पाय घसरून त्यांचा बुडून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आंबा बागेत राखणदार म्हणून काम करणाऱ्या वृद्धाचा खाडीत बुडून मृत्यू झाला. तुकाराम कान्हा बडद (मूळ राहणार उपळे- मोडकवाडी, ता. लांजा) असे मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे. रत्नागिरी येथील पावस काझीवाडा येथील हरिश सामंत यांच्या आंब्याच्या बागेत ते राखणदार म्हणून काम करत होते. पाय घसरून किंवा तोल जाऊन खाडीत पडल्याने त्यांचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. ही घटना सोमवारी दुपारी उघडकीस आली. त्याच्या आदल्या रात्री पाय घसरून खाडीतील पाण्यात पडले. यात त्यांचा मृत्यू झाला, असा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेची माहिती प्रवीण प्रकाश चालम (वय ३८, रा. गोळप धोपटवाडी) यांनी रत्नागिरी पूर्णगड सागरी पोलीस ठाण्यात दिली.

Rajapur crime : ‘त्या’ सलून चालकाच्या खुनाचं कारण झालं उघड; आरोपीनं दिली गुन्ह्याची कबुलीKonkan News: दापोलीत पोलिसांची धडक कारवाई; गुटख्याचा मोठा साठा जप्त

तुकाराम बडद हे १८ फेब्रुवारी २०२२ पासून आंबा बागायदार हरिश सामंत यांच्या आंबा बागेत राखणदार म्हणून काम करत होते. सामंत यांनी ही बाग कराराने प्रवीण प्रकाश वालम यांना दिली आहे. ८ मार्च रोजी सायकांळी ५ वाजताच्या सुमारास या बागेत पाहणी करण्यासाठी वालम गेले होते. त्यावेळी तुकाराम यांनी वालम यांच्याकडे शंभर रुपये मागितले. त्यांनीही तुकाराम यांना पैसे दिले. त्यानंतर वालम घरी निघून गेले. १४ मार्च रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास वालम हे घरी असताना, शोयब काझी यांचा दूरध्वनी आला. बागेतील कामगाराचा मृतदेह पावस मोहल्ला टपाल कार्यालयासमोरील खाडीमध्ये तरंगत असल्याची माहिती त्यांनी दिली. माहिती मिळताच वालम हे तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मृतदेहाची ओळख पटवली. मृतदेह बागेतील कामगार तुकाराम बडद यांचेच असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत पोलिसांनाही माहिती देण्यात आली होती. पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस नाईक प्रशांत पाटील करत आहेत.

मुंबई-गोवा महामार्गावर विचित्र आणि भीषण अपघात, ट्रकच्या जोरदार धडकेनंतर दुचाकी बसवर आदळली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here