बीड : महावितरणच्या गलथान कारभाराचा कळस पुन्हा एकदा पहावयास मिळाला आहे. ३३ केव्हीची विद्युत तार तुटून वडवणी तालुक्यातील बावी ताडा परिसरातील दामू राठोड आणि शेषेराव राठोड यांचा तब्बल १३ एकर ऊस चार म्हशी आणि दोनशे कोंबड्या जळून खाक झाल्या आहेत. शिवाय प्रल्हाद आडे यांचा गोठा जळून खाक झाला आहे. आग लागल्यानंतर जीव आणि संसार उपयोगी साहित्य वाचविण्यासाठी अक्षरशः शेतकरी कुटुंबाची मोठी धावपळ उडाली. याच धावपळीचा चित्तथरारक व्हिडीओ मोबाईल कॅमेरात कैद झाला आहे.

कालच माजलगाव तालुक्यातील टालेवाडी गावातील एका घरात विद्युत प्रवाह उतरून दोन बालकांचा करून अंत झाला होता. या घटनेला २४ तास झाले नसतानाच पुन्हा एकदा ही दुर्घटना घडल्याने महावितरण विरोधात रोष व्यक्त होत आहे. मात्र, या महिनाभरात महावितरणचा गलथान कारभाराने अनेक तालुक्यांमध्ये कित्येक एकर ऊस जळून खाक झाला आहे. यामध्ये अनेकांचा जीवदेखील यामध्ये गमवावा लागला आहे.

लॉकडाऊनमध्ये जुनाट दुचाकी विकून घोडा खरेदी केला; आता चक्क घोड्यावर निघाले नोकरीला
गेवराई तालुक्यातील तारेला चिटकून तो चिमुकला जीवाशी गेला. त्यानंतर माजलगावची घटना आणि आता बावी तांडावरील हा चित्तथरारक प्रसंग. यामुळे महावितरण कंपनीला आणखी किती शेतकऱ्यांचे व प्राण्यांचे जीव घ्यायचे आहेत? असा संतप्त सवाल शेतकऱ्यांकडून विचारण्यात आला आहे. मात्र, आता याची जबाबदार कोण घेणार ? आणि या संकटावर कशा पद्धतीने मात करावी? असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे.

बळीराजाचं इतकं नुकसान झालं असलं तरही या विषयावर महावितरणचे कर्मचारी ना पाहायला तयार न बोलायला तयार. यामुळे शेतकऱ्यांचा संताप आणखी वाढला असून कोणाकडे दाद मागायची असा मोठा प्रश्न आहे.

एक महिन्यानंतर महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले; समोर आली धक्कादायक माहिती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here