मुंबई: अभिनेत्री नीना गुप्ता आता मात्र बऱ्याच सिनेमांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारताहेत. त्यांचे सोशल मीडियावरचे व्हिडिओ देखील प्रचंड चर्चेत असतात. या व्हिडिओंमध्ये नीना त्यांच्या आयुष्यात आलेले चांगले वाईट अनुभव चाहत्यांसोबत शेअर करत असतात.

६२ वर्षीय वर्षीय नीना गुप्ता सध्या त्यांची सेकण्ड इनिंग तुफान एन्जॉय करताना दिसत आहेत. तरुण अभिनेत्रींना लाजवेल अशा स्टायलिश कपड्यांमध्ये नीना अनेकदा दिसतात. या वयात स्लायलिश कपडे घातल्यानं त्यांच्यावर नेटकऱ्यांनी बरेचदा टीका केली आहे. या टीकेला आणि ट्रोलर्सना नीना यांनी एका व्हिडिओद्वारे सडेतोड उत्तर दिलं आहे.
लग्न झालेल्या पुरुषावर प्रेम करु नका; नीना गुप्तांचा सल्ला
सेलिब्रिटींना अनेकदा शॉर्ट किंवा अंगप्रदर्शन करणारे कपडे घातल्यानं ट्रोल करण्यात येतं. त्यामुळं एखाद्याची त्याच्या कपड्यावरुन पारख करू नका, हे चुकीचं आहे,असं नीना यांनी या व्हिडिओत म्हटलंय.

काय म्हटलंय नीना यांनी इन्स्टाग्रावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये?
मला हे पोस्ट करणं गरजेचं वाटतंय. लोकांना असं वाटतं की सेक्सी (अंगप्रदर्शन करणारे) कपडे घालणारे लोक जसे आता मी घातलेत, असे लोक बेकार (बिघडलेले) असतात. पण मी तुम्हाला सांगते की. मी संस्कृतमध्ये एमफील केलंय. अजूनही बरंच काही शिकलेय. त्यामुळं कपड्यांवरून एखाद्याबद्दल तुमचं मत तयार करून नका, त्याची पारख करू नका, ट्रोल करणाऱ्यांनो हे लक्षात ठेवा’,असं नीना यांनी व्हिडिओमध्ये म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here