नागपूर : राज्यात रोज अनेक गुन्ह्यांच्या घटना समोर येत असतात. असाच एक धक्कादायक नागपूरमध्ये समोर आला आहे. सगळ्यात गंभीर बाब म्हणजे इथे एका मुलाची त्याच्याच आई आणि भावाकडून हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लहान मुलाच्या दारूच्या व्यसनाला कंटाळलेल्या आईने आपल्या मोठ्या मुलाच्या मदतीने त्याचा गळा आवळून खून केला. भुऱ्या ऊर्फ शुभम अशोक नानोटे (२२) असे या मृत व्यक्तीचे नाव असून, आई रंजना अशोक नानोटे (वय ४५) आणि भाऊ नरेंद्र नानोटे (वय २७) अशी आरोपींची नावे आहेत. निवडणुकांच्या तोंडावर शिवसेनेत फेरबदल, ‘या’ पदाधिकाऱ्यांची मुखपत्रातून घोषणा ही धक्कादायक घटना सोमवारी एकच्या सुमारास नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नंदनवन झोपडपट्टी परिसरात घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भुऱ्या गुन्हेगारी मानसिकतेचा होता. त्यावर नंदनवन पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. त्याला दारूचे व्यसन होते. तो गुन्हेगारीत सक्रिय होता. त्यामुळे त्याची आई रंजना अशोक नानोटे आणि भाऊ नरेंद्र नानोटे यांच्याशी पटत नव्हतं. पत्नीच्या उपचारांसाठी पैसे मागण्ययासाठी भुऱ्या आईकडे आला होता. आईने नकार दिल्याने त्यांच्यात वाद झाला आणि यातूनच हत्येचा धक्कादायक प्रकार घडल्याचं समोर आलं.