minor girl rape case: अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बलात्कार, कोर्टानं सुनावली ७ वर्षांची शिक्षा – minor girl rape case thane court sentenced auto rickshaw driver 7 years rigorous imprisonment
ठाणे : १७ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी ठाण्यातील कोर्टानं रिक्षाचालकाला सात वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. २०१७ साली ही घटना घडली होती. कोर्टानं आरोपी रिक्षाचालकाला सश्रम कारावासाची शिक्षा आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
ठाण्यातील कोर्टाने सोमवारी हा निकाल दिला. अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी कोर्टानं रिक्षाचालकाला ७ वर्षे सश्रम कारावास आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. ठाण्यात एकाच परिसरात आरोपी आणि पीडिता राहतात. पीडितेचे वडील देखील रिक्षाचालक आहेत. सरकारी वकिलांनी सांगितले की, २८ डिसेंबर २०१७ रोजी पीडितेचे आई-वडील काही कामानिमित्त बाहेर गेले होते. त्याचवेळी पीडिता बेपत्ता झाली होती. तिचा शोध घेतला. मात्र ती सापडली नाही. अखेर पालकांनी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ५६ वर्षीय इसमाकडून ३ अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार, त्यातील दोघी सख्ख्या बहिणी
आरोपी हा पीडितेला उत्तर प्रदेशातील भदोई येथे घेऊन गेला होता. डिसेंबर २०१७ ते मार्च २०१८ या कालावधीत आरोपीने तिच्यावर अनेकदा अत्याचार केले. या प्रकरणात आरोपीला अटक केली होती. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्यात पीडितेसह नऊ साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले. आरोप सिद्ध झाल्यानंतर कोर्टाने आरोपीला दोषी ठरवत, शिक्षा सुनावली आहे.