कीव्ह, युक्रेन :

रशिया आणि युक्रेन युद्धादरम्यान झालेल्या गोळीबारात जखमी होऊन एका अमेरिकन पत्रकाराचा मृत्यू झाला आहे. युक्रेनची राजधानी कीव्हनजिक इरपिन भागात ‘द न्यूयॉर्क टाईम्स’चे माजी पत्रकार ब्रेंट रेनॉड यांना आपला जीव गमवावा लागला आहे. युक्रेनच्या युद्धग्रस्त भूमीवर जीवाची जोखीम ओळखीची असूनही ५१ वर्षीय ब्रेंड रेनॉड ‘फ्रिलान्स पत्रकार’ म्हणून दाखल झाले होते.

स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५१ वर्षीय पत्रकार इरपिनमध्ये काम करत असताना झालेल्या गोळीबारात ठार झाले. या गोळीबारात रेनॉड यांचे सहकारी आणि पत्रकार जुआन अर्रेडोंडो हेदेखील गंभीर जखमी झाले आहेत. ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा युक्रेन सीमा पार करणाऱ्या निर्वासितांची कहाणी ब्रेंट आपल्या वार्तांकनातून मांडण्याचा प्रयत्न करत होते.

‘आम्ही इरपिन पूल ओलांडला होता. विस्थापितांशी बोलण्यासाठी आम्ही जाण्यासाठी आम्ही एका गाडीत बसलो होतो. कुणीतरी आम्हाला दुसऱ्या एका पुलावरून जाण्याचा सल्ला दिला. आम्ही एक चेकपॉईंट पार केल्यानंतर आमच्यावर अचानक गोळीबार सुरू झाला. यावेळी रेनॉड यांच्या गळ्याजवळ एक गोळी लागली आणि ते घटनास्थळीच कोसळले. गोळीबारात मीदेखील जखमी झालो परंतु, थोडं पुढे जाण्यात यशस्वी ठरलो’, अशी माहिती जखमी अर्रेडोंडो यांनी एका व्हिडिओतून दिलीय. मात्र, हे सैनिक कोणत्या देशाचे होते हे मात्र त्यांनी व्हिडिओत सांगितलेलं नाही.

मृतदेहासोबत आढळून आलेल्या अमेरिकन पासपोर्ट आणि ‘न्यूयॉर्क टाईम्स’चं जुनं ओळखपत्र अधिकाऱ्यांच्या हाती लागल्यानंतर ब्रेंट यांच्या मृतदेहाची ओळख पटली.

LIVE कॅमेऱ्यासमोर धडकत रशियन महिला संपादकाचा पुतीन यांना जोरदार झटका
Russia Ukraine War: चर्चेआधी तातडीनं युद्धबंदीची गरज, युक्रेनची मागणी
कोण होते ब्रेंट रेनॉड?

ब्रेंट रेनॉड हे पत्रकार होतेच शिवाय ते पुरस्कार विजेते सिनेनिर्मातेही होते. एनबीसी तसंच न्यूयॉर्क टाईम्स, एचबीओ, व्हाईस मीडिया अनेक यांच्यासहीत अमेरिकन मीडिया संस्थांसोबत त्यांनी काम केलं होतं. आपल्या कार्यकाळात त्यांनी अफगाणिस्तान, हैती, इराक, मॅक्सिको आणि युक्रेन इथल्या संघर्षाचं वृत्तांकन करत सामान्यांची परिस्थिती जगासमोर मांडण्याचा प्रयत्न केला होता. तसंच रेनॉड हे २०१८ ते २०१९ या कालावधीत हार्वर्ड विद्यापीठात ‘निमन फाउंडेशन फॉर जर्नालिझम’चे फेलो होते.

रेनॉड यांच्या मृत्यूनंतर त्यांच्याजवळ टाईम्सचा प्रेस बॅच आढळला होता. ‘न्यूयॉर्क टाईम्स’नं ब्रेंट रेनॉड आपल्या वर्तमानपत्रासोबत कार्यरत होते, याची पुष्टी केली. मात्र, वर्तमानपत्राकडून ते युक्रेनमध्ये वार्तांकनासाठी गेले नव्हते, असं स्पष्टीकरणही देण्यात आलंय.


अमेरिकन परराष्ट्र मंत्रालयानं दु:ख केलं व्यक्त

रशिया युक्रेन युद्धात एका अमेरिकन पत्रकाराचा मृत्यू झाला असेल तर ही भयंकर घटना आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि त्यांच्या सेनेच्या निर्दयतेचं हे एक उदाहरण आहे. शाळा, मस्जिद, रुग्णालय आणि पत्रकारांनाही त्यांनी आपल्या निशाण्यावर घेतलंय, अशा शब्दांत अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सलीवान यांनी या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त केलीय. ब्रेंट रेनॉड यांच्या मृत्यूच्या बातमीला दुजोरा देताना अमेरिकेच्या परराष्ट्र विभागानं रेनॉड यांच्या कुटुंबीयांना शक्य ती संभाव्य मदत करत असल्याचं म्हटलंय.

‘सैन्याची माहिती सोशल मीडियावर नको’

दरम्यान, ब्रेंट रेनॉड यांच्या मृत्यूनंतर युक्रेननं रविवारी इरपिनमध्ये मीडियाला बंदी जाहीर केलीय. परिस्थिती ध्यानात घेता पत्रकारांना आता इरपिन शहरात प्रवेश करण्याची परवनगी दिली जाणार नाही, असं मेअर अलेक्झांडर यांनी म्हटलंय. तसंच युक्रेन सैन्य आणि त्यांच्या उपकरणांबद्दल सोशल मीडियावर माहिती पोस्ट केली जाऊ नये, असं आवाहनही त्यांनी पत्रकार आणि युक्रेनियन नागरिकांना केलंय.

Volodymyr Zelensky: झेलेन्स्कींनी रुग्णालयात जाऊन घेतली जखमींची भेट, ‘नाटो’ला पुन्हा चुचकारलं
Covid19: ओमिक्रॉन आणि डेल्टा मिश्रित नव्या व्हेरियंटचा चीनला धसका, जगभरात चौथी लाट पसरणार?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here