रशिया आणि युक्रेन युद्ध २० व्या दिवशीही सुरूच आहे. मात्र याच दरम्यान ब्रिटनच्या संरक्षण सूत्रांकडून अतिशय महत्त्वाचा दावा करण्यात आलाय. रशियाकडे आता केवळ १० ते १४ दिवस पुरेल इतकाच दारुगोळ्याचा साठा उरल्याचं ब्रिटनच्या गुप्तचर सूत्रांनी म्हटलंय.
रशियानं चीनकडून सैन्य मदतीच्या रुपात हत्यारं आणि ड्रोन विमानांची मागणी केल्याच्या काही बातम्या नुकत्याच समोर आल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर ब्रिटनचा हा दावा अतिशय महत्त्वाचा ठरतोय.
रशिया-युक्रेन युद्धात अमेरिकन पत्रकारानं गमावला जीव, युद्धभूमीवर काय घडलं नेमकं…
रशियाकडे अपुरा दारुगोळ्याचा साठा
दारुगोळा संपुष्टात येत असल्यानं रशियाला युद्धाच्या मैदानात युक्रेनशी दोन हात करण्यातही अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. इतकंच नाही तर युक्रेनच्या ज्या भागांवर रशियानं ताबा मिळवलाय तो कायम ठेवणंही रशियन लष्कराला जड जाताना दिसून येतोय.
रशिया-युक्रेन युद्धाचा आज (मंगळवारी) २० वा दिवस आहे. याच दरम्यान अमेरिकन अधिकाऱ्यांनी केलेल्या दाव्यानुसार, रशियाकडून जमिनीवर केला जाणारा हल्ला जवळपास थांबला आहे.
युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी, रशियाचे ८० लढावू विमानं पाडल्याचा दावा केलाय. ही शंख्या लवकरच शेकडोंमध्ये पोहचेल. तसंच रशियन सैन्याचे शेकडो टँक आणि हजारो उपकरणंही नष्ट झाल्याचं झेलेन्स्की यांनी म्हटलंय.