सिंधुदुर्ग : मालवण येथील सर्जेकोट बंदरात मासेमारी नौकेला आग लागल्याची घटना आज, मंगळवारी घडली. या दुर्घटनेत नौकेचे अंदाजे ६ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. स्थानिकांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. समुद्रात गेलेली नौका मासेमारीनंतर बंदरात उभी केली होती. त्याचवेळी ही दुर्घटना घडली.

मासेमारीकरिता गेलेली नौका मासेमारी करून बंदरात उभी होती. मच्छिमार नितीन नारायण परुळेकर यांची कृष्णछाया ही नौका समुद्रातून मासेमारी करून मंगळवारी सकाळी सर्जेकोट बंदरात उभी केली होती. नौकेवरील एका खलाशाची तब्येत बरी नसल्याने नौका बंदरात उभी करून अन्य खलाशांनी त्याला रुग्णालयात नेले होते. या दरम्यान समुद्रात उभ्या असलेल्या नौकेला आग लागली. स्थानिकांनी तात्काळ धाव घेत मदतकार्य सुरू केले. नौकेला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवले. तोपर्यंत नौकेचे मोठे नुकसान झाले होते. मत्स्य विभागाच्या वतीने दुर्घटनेचा पंचनामा करण्याची कार्यवाही सुरू आहे. मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण समजू शकलेले नाही.

सिंधुदुर्ग: फोंडाघाटात उद्योजकाच्या कारला आग, एकाचा होरपळून मृत्यू; पण….
विमान दुरुस्तीला ब्रेक; एअर इंडियाच्या एमआरओतील टेक्निशिअन संपावर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here