वाचा-
स्कॉट हॉलचा समावेश WWEमधील मोठ्या सुपरस्टारमध्ये केली जाते. त्यांनी दोन वेळा वर्ल्ड चॅम्पियनशिपचे विजेतेपद मिळवले होते. स्कॉट हॉल यांना काही दिवसांपूर्वी दुखापत झाली होती. त्यानंतर त्याची प्रकृती खराब होत गेली.
वाचा-
२० ऑक्टोबर १९५८ रोजी अमेरिकेत झाला. १९८४ साली त्यांनी रेसलिंग करिअरची सुरूवात केली. त्यानंतर १९९१ साली त्यांनी वर्ल्ड चॅम्पियनशिप रेसलिंगमध्ये सहभाग घेतला. या स्पर्धेत भाग घेतल्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. १९९२ साली स्कॉट हॉल मध्ये आले. रिंगमध्ये ते Razor Ramon या नावाने ओळखले जात होते.
वाचा-
WWE मध्ये स्कॉट हॉल यांनी चार वेळा इंटरकोन्टिनेंटल चॅम्पियनशिपमधील सर्व मान मिळवले होते. या शिवाय नव्या पिढीसाठी ते एक आदर्श होते. १९९५मध्ये समरस्लॅम आणि रेसलमेनियामध्ये स्कॉट यांच्या केव्हिन नॅश, ब्रेट हार्ट, शॉन मायकल्स यांच्यासह अनेक मोठ्या स्टार सोबत लढती झाल्या होत्या. १९९६ साली स्कॉट यांनी पुन्हा वर्ल्ड चॅम्पियनशिप रेसलिंगमध्ये भाग घेतला आणि निवृत्तीपर्यंत ते तेथेच राहिले. रेसलिंगमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्यांचा WWEच्या हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला. WWE मधील सर्व सुपरस्टार्सनी हॉल यांच्या निधनावर शोक व्यक्त केलाय.
वाचा-
…