मुंबई : बहुचर्चित चित्रपट ‘द कश्मीर फाइल्स‘ (The Kashmir Files) नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाबाबत आज मंगळवारी दिल्लीत भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले मत मांडले. या चित्रपटाचे त्यांनी कौतुक केले. उपस्थित खासदार आणि नेत्यांना हा चित्रपट बघण्याचा सल्ला त्यांनी दिला. अशा प्रकारच्या चित्रपटांची आणखी निर्मिती झाली पाहिजे, असे मोदी या बैठकीत म्हणाले. मात्र, महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी याबाबत वेगळी भूमिका मांडली आहे. भाजपच्या काही नेत्यांनी हा चित्रपट ‘ट्रक्स फ्री’ करण्यात यावा, अशी मागणी केली होती. या चित्रपटामुळे समाजात तणाव वाढू शकतो, असे मत त्यांनी मांडले.

मुंबईचे भाजप अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी विधानसभेत ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट अन्य राज्यांप्रमाणेच महाराष्ट्रातही टॅक्स फ्री करण्यात यावा, अशी मागणी केली होती. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात, कर्नाटक, हरयाणा यांसारख्या राज्यांतही हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आला आहे. या मागणीला उत्तर देताना दिलीप वळसे पाटील म्हणाले की, या चित्रपटाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोक सिनेमागृहांमध्ये नेण्याची जे प्रयत्न सुरू झाले आहेत, त्याने दोन समाजांमध्ये तणाव निर्माण होईल, असे ते म्हणाले. सध्या ‘द कश्मीर फाइल्स’च्या बदल्यात आता झुंड सिनेमा मोफत दाखवला जात आहे. यामुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असेही ते म्हणाले.

‘द काश्मीर फाइल्स’ सिनेमावर पंतप्रधान मोदींनी केले भाष्य

hijab ban : कर्नाटक हायकोर्टाच्या निर्णयावर भडकले ओवेसी; म्हणाले, ‘मुस्लिम मुलींना… ‘

गृहमंत्री वळसे पाटील विधानसभेत म्हणाले की, चित्रपट संपल्यानंतर चित्रपटगृहांच्या बाहेर लोकांना एकत्र करून हिंदू जनजागृती समितीशी संबंधित लोक त्यांच्यासोबत संवाद साधतात. त्यालाच उत्तर म्हणून दुसरीकडे ‘झुंड’ हा सिनेमा मोफत दाखवण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. अशा परिस्थितीत कायदा आणि सुव्यवस्था बिघडू शकते.’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here