जळगाव : ‘देवेंद्र फडणवीस यांना एक नोटीस आली आणि त्यांचा जळफळाट सुरू झाला आहे. देवेंद्रजी म्हणतात मी भ्रष्टाचार बाहेर काढला म्हणून माझी पिळवणूक सुरू झाली. भाजपमध्ये असताना तुम्ही नाथाभाऊंची पिळवणूक केली नाही का?’ असा सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. (Eknath Khadse Vs Devendra Fadnavis)

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सायबर पोलिसांनी चौकशीसाठी समन्स पाठवल्याने त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर ताशेरे ओढले आहेत. यावरून एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. मुक्ताईनगर तालुक्यातील पुरनाड येथे आयोजित कार्यक्रमात खडसे बोलत होते. यावेळी त्यांनी आपल्या भाषणातून देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले.

‘जो खड्डे खणतो, तोच त्या खड्ड्यात पडतो’; फडणवीसांचा ठाकरे सरकावर गंभीर आरोप

‘मी मुख्यमंत्रिपदाचा दावेदार होतो हे तुम्हाला माहीत होताच तुम्ही माझी पिळवणूक सुरू केली. माझ्यामागे जमीन भूखंड प्रकरण, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या बायकोसोबत संबंध जोडले, अंजली दमानिया यांना माझ्यामागे लावलं, हे उद्योग कोणी केले?’ अशा शब्दांत खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांना फटकारलं आहे.

‘फडणवीसांचा कालखंडात माझे फोन टॅप झाले’

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना फोन टॅप झाल्याचा गंभीर आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे. ‘फोन कोणाचे टॅप होतात ज्यांचे अंडरवर्ल्डशी संबंध आहेत त्यांचेच फोन टॅप होतात. माझे काय देशद्रोह्यांसोबत संबंध आहेत का? मग माझा फोन टॅप करण्याचं कारण काय?’ असा सवाल करत एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here