लखनऊ: करोनाची लागण झाल्यानं गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेली बॉलिवूड गायिका करिना कपूर हिला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आहे. कनिका गेल्या अनेक दिवसांपासून उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये होती. विषाणूची लागण झाल्यामुळं तिला संजय गांधी ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. दरम्यानं शनिवारी तिची करोनाची सहावी टेस्ट निगेटिव्ह आल्याचं समोर आली. त्यानंतर केलेली करोनाची चाचणी देखील निगेटिव्ह आल्यानं तिला डिस्चार्ज देण्यात आला आहे.

हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यापासून कनिकाची व्यवस्थित काळजी घेण्यात येत होती. उपचारांदरम्यान तिच्या एकूण सहा करोना चाचण्या करण्यात आल्या होत्या. पाच चाचण्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर तिच्या कुटुंबियांनी रिपोर्टवर शंका उपस्थिती केली होती. सहावी चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर तिची तब्येत ठीक असून घाबरण्याचं कोणतंही कारण नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. परंतू पुढचे दोन दिवस तिला हॉस्पिटलमध्ये राहावं लागणार असं डॉक्टरांकडून सांगण्यात आलं होतं. अखेर आज तिला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आहे. डिस्चार्ज मिळाला असला तरी कनिकाला आणखी १४ दिवस क्वारंटाइनमध्येच राहावं लागणारआहे.

वाचा:

करोनाची चौथी टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर कनिकानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. ‘आशा करते की माझी पुढची टेस्ट निगेटिव्ह येईल.’ अशा कॅप्शनने तिनं पोस्ट शेअर केली होती. यासोबतच कनिकानं ‘आयुष्य आपल्याला वेळेचा सदुपयोग करायला शिकवते आणि वेळ आपल्याला आयुष्याची किंमत सांगते.’या पोस्टमध्ये कनिकाला तिच्या मुलांची आणि कुटुंबाची प्रचंड आठवण येत असल्याचं सांगितलं होतं. कनिकाने स्वतः इन्स्टाग्रामवर तिला करोनाची लागण झाल्याचं सांगितलं होतं. पण काही दिवसांनी तिने ती पोस्ट डिलीट केली होती.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here