जळगाव : भुसावळ रेल्वे स्थानकावर थांबलेल्या सांगोला-मुजफ्फरपूर किसान रेलच्या बोगीला आग लावण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. एका महिलेने खिडकीतून माचीसच्या साहाय्याने आग लावली. ही धक्कादायक घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. (Railway Fire Accident)
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच भुसावळ विभागाचे रेल्वे प्रबंधक तथा रेल्वेचे अधिकारी यांनी घटनास्थळी पाहणी केली. सदर महिलेने हे कृत्य का केलं, याचं कारण अद्याप समोर आलं नसून याबाबत रेल्वे सुरक्षा बलाकडून सदर महिलेचा शोध सुरू आहे.