पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख आणि आरोपी अब्दुल्ला दोघेही बुधवार पेठेत राहण्यास असून ते एकमेकांच्या परिचयातील आहेत. शेख याने काही दिवसांपूर्वी अब्दुल्ला याच्याकडून हातउसने पैसे घेतले होते. ते पैसे परत देण्यास तो नकार देत होता. त्याचा राग अब्दुल्लाच्या डोक्यात होता. सोमवारी रात्री अब्दुल्लाने दारू पिण्याच्या बहाण्याने शेखला डेंगळे पुलाखाली आणले. त्या ठिकाणी पैशांची मागणी केली. मात्र, शेखकडून पैसे मिळत नसल्याने त्याने शेखचा मोबाईल ताब्यात घेतला. यावरून दोघांमध्ये वादावादी झाली. यावेळी अब्दुल्ला याने शेखच्या डोक्यात दगड घातला. यात गंभीर जखमी झालेल्या शेखचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर तो पसार झाला. या घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
शेखचा खून केल्यानंतर बबलू तेथून पसार झाला होता. पोलिसांना घटनास्थळी रक्ताने माखलेला एक शर्ट मिळाला होता. मृतदेहाची ओळख पटवण्यापासून ते आरोपीला पकडण्याचं पोलिसांसमोर आव्हान होते. सीसीटीव्ही चित्रीकरण तपासताना सद्दाम व बबलू बुधवारपेठेत एकत्र फिरत असताना दिसले. त्यानुसार पोलीस बबलूच्या घरी पोहोचले आणि बबलूला ताब्यात घेतले. पोलिसांनी चौकशी केली असता, तो उडवाउडवीची उत्तरे देत होता. मात्र रक्ताने माखलेला शर्ट बबलूने घातला असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यांनी त्याला शर्टबाबत विचारणा केली असता तो खोटे बोलला. मात्र पोलिसांनी कॅमेर्यातील त्याचा शर्ट व रक्ताने माखलेला तो शर्ट दाखवताच त्याने खूनाची कबुली दिली.