वृत्तसंस्था, मुंबईः रशिया – युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचे चटके आता विविध उत्पादनांना बसू लागले आहेत. ग्राहकोपयोगी व एफएमसीजी क्षेत्रातील कंपन्यांचा उत्पादन खर्च यामुळे वाढू लागला असून हिंदुस्थान युनिलिव्हर आणि नेसले इंडिया या कंपन्यांनी आपल्या काही उत्पादनांच्या किंमतींत वाढ केली आहे. सीएनबीसी टीव्ही-१८ ने दिलेल्या वृत्तानुसार, हिंदुस्थान युनिलिव्हरने ब्रू कॉफीची किंमत ३ ते ७ टक्क्यांनी वाढवली आहे.

हिंदुस्थान युनिलिव्हरच्या ब्रू गोल्ड कॉफी जारच्या किंमतीत ३ ते ४ टक्क्ायंनी वाढ करण्यात आली असून ब्रू इन्स्टन्ट कॉफी पाऊचची किंमत ३ ते ६.६ टक्क्यांनी वाढवण्यात आली आहे. याच कंपनीच्या ताज महाल या प्रसिद्ध चहाची किंमत ३.७ ते ५.८ टक्क्यांनी वाढली आहे. ब्रुक बॉण्ड चहा १.५ ते १४ टक्क्यांनी महागला आहे. उत्पादन खर्चासह महागाई सातत्याने वाढत असल्यामुळे ही भाववाढ करावी लागल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.

नेसले इंडियाची उत्पादनेही महागली आहेत. मुलांचे आवडते मॅगी नूडल्स ९ ते १६ टक्क्यांनी महागले आहे. याच कंपनीची दुधाची भुकटी व कॉफी पावडर यांच्याही किंमती वाढल्या आहेत. ७० ग्रॅमचा मॅगी मसाला नूडल्सचा पॅक १२ ते १४ रुपयांनी वाढल्या आहेत. याच प्रकारातील १४० ग्रॅम वजनाचा पॅक ३ रुपयांनी वाढला आहे. नेसले इंडियाने दुधाच्या एक लीटीरच्या कार्टनची किंमत ३ रुपयांनी ावढवली आहे. नेसकॅफे क्लासिक कॉफीची किंमत ३ ते ७ टक्क्यांनी वाढली आहे.

उत्पादन खर्चात वाढ

कच्चा माल, पॅकेजिंग यासाठी एफएमसीजी क्षेत्रातील कंपन्यांना अधिक पैसे मोजावे लागत आहेत. पामतेल, कॉफी, दूध, पॅकिंग मटेरियल या सर्वाचे भाव वाढले आहेत. काही कच्च्या मालाची टंचाईही निर्माण झाली आहे. त्यामुळे विक्रीयोग्य उत्पादनाची किंमत वाढली असून याची झळ सर्वसामान्य ग्राहकाला बसू लागली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here