मुंबई: आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूक तुर्तास लांबणीवर पडली असली तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) मराठीच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे. याचेच प्रत्यंततर मंगळवारी रात्री मुंबईत आले. इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएल स्पर्धेतील (IPL 2022) खेळाडुंसाठी परराज्यातून मागवलेल्या लक्झरी बसच्या मुद्द्यावरून मनसेने (MNS) राडा घातला आहे. मनसे वाहतूक सेनेच्या कार्यकर्त्यांनी काल रात्री ताज हॉटेलच्या परिसरात उभ्या असणाऱ्या लक्झरी बसेसची तोडफोड केली. येत्या २६ तारखेपासून मुंबईत आयपीएल स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेतील सर्वाधिक सामने हे महाराष्ट्रात खेळवले जाणार आहेत. या सामन्यांसाठी खेळाडूंना हॉटेलपासून मैदानापर्यंत नेण्यासाठी लक्झरी बसेस वापरण्यात येणार आहेत. परंतु, या बसेस गुजरात आणि दिल्लीहून मागवण्यात आल्या आहेत.
आयपीएल बीसीसीआयसाठी ठरतेय सोन्याची खाण, यंदाची कमाई ऐकाल तर हैराणच व्हाल….
आयपीएलचे सामने महाराष्ट्रात असूनही लक्झरी बसेस बाहेरून मागवल्याने राज्यातील वाहतूक व्यावसायिकांचा रोजगार हिरावला गेला आहे. यावरच आक्षेप घेत मनसेच्या कार्यकर्त्यांनी बाहेरगावातून आणलेल्या या लक्झरी बसेसला विरोध केला आहे. याच रागातून मनसेच्या वाहतूक सेनेच्या कार्यकर्त्यांनी ताज हॉटेलच्या परिसरात उभ्या असणाऱ्या बसगाड्यांना लक्ष्य केले. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी या बसेसच्या काचा आणि आरसे तोडले. त्यामुळे आता आयपीएल व्यवस्थापक यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार करणार की मनसेची मागणी मान्य करणार का, हे पाहावे लागेल.

लिलावात कोणीही संघात न घेतलेल्या सुरेश रैनाची आयपीएलमध्ये एंट्री, पाहा नेमकं काय करणार…
राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी नुकत्याच मुंबईत झालेल्या बैठकीत पक्षातील नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या होत्या. सध्या महापालिकांच्या निवडणुका लांबणीवर गेल्या असल्या, तरी यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहा. एखाद्या पक्षाचे अस्तित्व हे त्या पक्षाकडून हाती घेण्यात येणाऱ्या चळवळीतून समोर येत असते. त्यामुळे याचे भान राखून पक्षातर्फे चळवळ उभारा. मराठीचा विषय आला, तर नागरिकांना मनसे आठवली पाहिजे, असे राज ठाकरे यांनी म्हटले होते. मनसेची ही बैठक सोमवारी पार पडली होती. त्यामुळे राज ठाकरे यांचा आदेश शिरसावंद्य मानत पुढच्या काही तासांमध्येच मनसेच्या कार्यकर्त्यांनी या मुद्द्यावरून राडा घातला आहे. त्यामुळे आता या सगळ्याचे काय पडसाद उमटतात, हे पाहावे लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here