Fire in Alibaug | अलिबागच्या कणकेश्वर डोंगरावर वणव्याने पेट घेतला. रात्री उशीरापर्यंत अग्निशामन दल आणि वनखात्याच्या कर्मचाऱ्यांकडून आग विझविण्याचे प्रयत्न सुरु होते

 

Fire in Alibaug
Major fire: कनकेश्वर डोंगरावर वणवा भडकला

हायलाइट्स:

  • भाविकांनी, पर्यावरण प्रेमींनी ही बातमी समजताच त्यांनी हळहळ व्यक्त केली
  • आग लावणाऱ्या समाजकंटकावर कडक कारवाई
मेहबुब जमादार, रायगड: अलिबाग तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असणाऱ्या डोंगरावर मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास वणव्याने पेट घेतला. वणवा झपाट्याने पसरत गेल्याने आगीने भीषण स्वरुप धारण केले होते. या आगीत कनकेश्वर डोंगरावरील औषधी वनसंपत्ती बरोबरच इतर महत्त्वाच्या वनस्पती, सूक्ष्म जीव आदींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आगीची वर्दी मिळताच अग्निशामन दल घटनास्थळी तातडीन दाखल झाले. त्यानंतर रात्री उशीरापर्यंत अग्निशामन दल आणि वनखात्याच्या कर्मचाऱ्यांकडून आग विझविण्याचे प्रयत्न सुरु होते. वनरक्षक पंकज घाडी, पर्यावरणमित्र संकेत राजेंद्र कवळे, पर्यावरणमित्र संकेत राजेंद्र कवळे, साईश पाथरे, विवेक जोशी हे देखील मदतकार्यात सहभागी झाले होते. मात्र, यावेळी नजीकच्या गावांमधील लोकांनी मदतीसाठी पुढाकार न घेतल्यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे. वणवा लागल्याची माहिती याठिकाणी येणाऱ्या भाविकांनी, पर्यावरण प्रेमींना समजताच त्यांनी हळहळ व्यक्त केली आहे. निसर्गरम्य डोंगरावर काळी चादर पसरून आता डोंगर काळेकुट्ट दिसणार म्हणून खंतही व्यक्त केली आहे. तसेच आग लावणाऱ्या समाजकंटकावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. (Major Fire in Alibaug Maharashtra)

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : major fire in kanakeshwar forest mountain alibaug medicine plants and trees burned
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here