कीव्ह, युक्रेन :

रशिया आणि युक्रेन दरम्यान सुरू असलेलं युद्ध आता हळूहळू निवळत असल्याची चिन्हं दिसून येत आहेत. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी याबद्दल संकेत दिलेत. तीन आठवड्यांच्या युद्धानंतर चर्चेदरम्यान रशियाकडून आता अधिक ‘वास्तववादी’ मागण्या केल्या जात असल्याचं झेलेन्स्की यांनी म्हटलंय. दोन्ही पक्षांना चर्चेसाठी अधिक वेळ देण्याची गरज आहे. रशियाकडून केल्या जाणाऱ्या मागण्यांवर विचार करण्यावर युक्रेनची तयारी असल्याचे संकेत झेलेन्स्की यांच्या वक्तव्यातून दिसून येतेय.

याअगोदर, युक्रेननं आता ‘नाटो’मध्ये सहभागी होण्याबद्दल विचार मागे टाकल्याचं वक्तव्य युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी केलंय.

‘बैठकी सुरू आहेत आणि चर्चेदरम्यान रशियाकडून पहिल्यापेक्षा अधिक वास्तववादी मागण्या केल्या जात आहेत, असं मला सांगण्यात आलंय. परंतु युक्रेनच्या हिताचा निर्णय घेण्यासाठी अधिक वेळेची आवश्यकता आहे’, असं रात्री उशिरा जारी केलेल्या व्हिडिओत झेलेन्स्की यांनी म्हटलंय.

यासोबतच, युक्रेनला अधिक हत्यारांचा पुरवठा केला जावा आणि आणखीन कडक निर्बंध लादून रशियावर दबाव कायम ठेवण्याचं आवाहनही झेलेन्स्की यांनी पश्चिमी राष्ट्रांना केलंय.

Ukraine Crisis: रशियाचा आक्रमकपणा थंडावणार? दारुगोळा संपण्याच्या बेतावर…
Ukraine Crisis: रशिया-युक्रेन युद्धात अमेरिकन पत्रकारानं गमावला जीव, युद्धभूमीवर काय घडलं नेमकं…

नो फ्लाय झोन‘च्या मागणीचा पुनरुच्चार

रशियाची क्षेपणास्र आणि फायटर जेट रोखण्यासाठी युक्रेनच्या आकाशात नो फ्लाय झोन घोषित करण्यात यावेत, या मागणीचा पुनरुच्चारही झेलेन्स्की यांनी केलाय.

युद्धाच्या २१ व्या दिवशीही रशियन सेना युक्रेनच्या आतल्या भागात घुसखोरी करू शकलेली नाही परंतु, रशियाकडून शहरांवर मोठ्या प्रमाणात गोळीबार सुरू आहे, असा दावाही झेलेन्स्की यांनी केला. युक्रेनियन लष्करानं केलेल्या दाव्यानुसार, खारकीव्हमध्ये रशियन सेनेचा हल्ला अपयशी ठरलाय.
NATO War Games: रशियाला घेरण्यासाठी ‘नाटो’ मैदानात? नॉर्वेत युद्धाभ्यास सुरू
LIVE कॅमेऱ्यासमोर धडकत रशियन महिला संपादकाचा पुतीन यांना जोरदार झटका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here