मुंबई: काश्मिरी पंडितांच्या विस्थापितांवरील अत्याचार व विस्थापितांच्या व्यथा मांडणाऱ्या ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाची सध्या प्रचंड चर्चा सुरू आहे. या चित्रपटाबद्दल विविध प्रतिक्रिया येत आहेत. इतकंच नव्हे, तर चित्रपटावरून राष्ट्रीय राजकारणात आता वादंग सुरू झाला आहे. तर बॉलिवूडमध्ये दोन गट पडल्याचं चित्र आहे. एक गट या चित्रपटाचं प्रमोशन करत आहे तर दुसरा गटानं चित्रपटाबद्दल न बोलण्याचा निर्णय घेतलाय. असं असताना अभिनेता रितेश देशमुख यानं ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाबद्दल केलेलं ट्विट चर्चेत आलंय.

रितेशनं ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट पाहिला. चित्रपट पाहिल्यानंतप त्यानं त्याच्या भावना ट्विटरवर व्यक्त केल्या आहेत. ‘आता कौतुक करायलाच हवं. ज्या चित्रपटानं अनेक विक्रम मोडले. चित्रपट छोटा असला तरी बॉलिवूडच्या मोठ्या चित्रपटांपैकी एक होण्याच्या मार्गावर आहे. सर्वांचे अभिनंदन!’, असं म्हणत रितेशनं दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री , अभिनेत्री पल्लवी जोशी आणि अभिनेते अनुपम खेर यांचं कौतुक केलं आहे.
बॉलिवूड चित्रपटांची शतकी खेळी, मराठी सिनेसृष्टीतही उत्साहाचे वारे
मोठ्या सेलिब्रिटीबद्दल बोलायचं झालं तर केवळ रितेशचं नव्हे तर, अक्षय कुमार, यामी गौतम ,के.के मेनन कंगना रणौत यांनी या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. ‘द काश्मीर फाईल्स’मधील अभिनयाबद्दल अनुपम खेर यांचं कौतुक केलंय. तो म्हणाला, ‘द काश्मीर फाइल्स’ मधील अनुपम यांच्या अभिनयाची प्रचंड चर्चा ऐकतोय. इतक्या मोठ्या संख्येनं प्रेक्षक पुन्हा सिनेगृहात येतायत हे पाहून भारी वाटतंय. लवकरच चित्रपट पाहणार आहे’, असं अक्षयनं त्याच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here