बिग बॉस मराठी‘च्या तिसऱ्या पर्वाचा महाविजेता ठरलेला अभिनेता विशाल निकम घराघरांत पोहोचला. शोमधील त्याच्या खेळानं आणि सादरीकरणानं त्यानं अनेकांची मनं जिंकली. विशेषतः विशालची तरुणांमध्ये प्रचंड क्रेझ पाहायला मिळतेय.

बिग बॉसनंतर विशाल कोणत्या नव्या मालिकेत दिसणार? याबाबत प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता होती. ती आता संपली असून छोट्या पडद्यावरील ‘आई : मायेचं कवच’ या मालिकेत विशाल मानसिंग ही भूमिका साकारत एंट्री घेणार आहे.

या भूमिकेबाबत विशाल म्हणाला, ‘बिग बॉस मराठीनंतर पुन्हा एकदा अभिनय करतोय; त्याबद्दल आनंद आहे. बिग बॉस मराठी संपल्यानंतर ठरवलं होतं की प्रेक्षकांचं मनोरंजन करेन आणि आज पहिलं पाऊल उचललंय. मानसिंग हे पात्र आजपर्यंत केलेल्या भूमिकांपेक्षा खूप वेगळं असून आव्हानात्मकदेखील आहे.
BBM 3 विजेता विशाल निकमने विकत घेतली नवीन गाडी, चाहत्यांनी केला शुभेच्छांचा वर्षाव


मालिकेत उत्तम कलाकार आहेत आणि त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळणार आहे. मानसिंग प्रत्येकाच्या मनात छाप सोडून जाईल असाच माझा प्रयत्न असेल.’ आता या मालिकेत त्याचा लूक आणि पात्र नेमकं कसं असेल; याबाबत त्याच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here