मुंबई : मराठी मनोरंजनविश्वातील अनेक कलाकार प्राणीप्रेमी आहेत. अनेकदा ते प्राण्यांसाठी करत असलेल्या उपक्रमांविषयी सोशल मीडियावरून चाहत्यांना माहिती देत असतात. अभिज्ञा भावे हे त्या कलाकारांपैकीच एक नाव. तिचं प्राणीप्रेम सर्वांनाच माहीत आहे. भटक्या मांजरी आणि कुत्र्यांची ती नेहमीच काळजी घेत असते.

अभिज्ञाच्या वाढदिवसाच्या दिवशी तिचं हे प्रेम पुन्हा एकदा सगळ्यांसमोर आलं आहे. तीन दिवसांपूर्वी झालेल्या तिच्या वाढदिवसानिमित्त तिनं प्राण्यांची काळजी घेणाऱ्या एका सामाजिक संस्थेला भेट दिली. तिनं त्या संस्थेला फक्त भेटच दिली नाही तर त्यांना मदतही केली. त्या संस्थेत भटके, जखमी किंवा स्वतःहूनच तिथपर्यंत पोहोचलेले कुत्रे, मांजरीसह विविध प्राण्यांची आणि पक्ष्यांची काळजी खूप छान घेतली जाते.
छोटा चित्रपट… ‘द काश्मीर फाइल्स’ पाहिल्यानंतर रितेश देशमुख स्पष्टच बोलला
‘आपण जसं कर्म करतो तसंच आपल्याला फळ मिळतं. आपलं पुढे काय होईल माहीत नाही. त्यामुळे जोपर्यंत आपण आहोत, तोपर्यंत या मुक्या मित्रांशी आपण चांगलंच वागायला हवं’, असं अभिज्ञा म्हणते. अनाथ मुक्या प्राण्यांकडे दुर्लक्ष केलं जातं त्यामुळे त्यांच्यासाठी जितकं करता येईल ते करायचा तिचा नेहमीच प्रयत्न असल्याचं ती सांगते. म्हणूनच यावर्षी तिनं तिचा वाढदिवस त्यांच्याबरोबर साजरा केला.


विशाल निकमचं चाहत्यांना सरप्राइज; या मालिकेत साकारणार महत्त्वाची भूमिका
अभिज्ञाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, लवकरच ती छोट्या पडद्यावर दिसणार आहे. नव्या मालिकेतून एका हट के भूमिकेत ती चाहत्यांसमोर येत आहे. आतापर्यंत वैविध्यपूर्ण भूमिका साकारत अभिज्ञानं चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. आगामी मालिकेतली भूमिकाही अशीच हट के असणार आहे आणि चाहत्यांना ती आवडेल, अशी अभिज्ञाला खात्री आहे.

सोशल मीडियावर चाहत्यांशी संवाद साधताना अभिज्ञा म्हणाली, ‘सो, ऑफिशिअली मी तुम्हाला पुन्हा भेटायला येत आहे. एका अशा भूमिकेत जी मला याआधी करायला मिळाली नाही. मी आशा करते, की प्रेक्षकांकडून मला भरभरून प्रेम आणि पाठिंबा मिळेल. कारण माझी मेहनत १०० पटीनं जास्त असणार आहे.’ अभिज्ञाची भूमिका आणि तिचा लूक या गोष्टी अद्याप कळलेल्या नाहीत, त्यामुळे चाहत्यांना ते जाणून घ्यायची उत्सुकता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here