परभणी : राज्यात गुन्ह्यांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. असाच एक भयंकर प्रकार परभणीत समोर आला आहे. परभणी तालुक्यातील असोला इथे वृध्द दाम्पत्याचा तिक्ष्ण हत्याराने गळा चिरुन खून करण्यात आला आहे. तर एक महिला गंभीर जमखी झाली आहे. सदर प्रकार बुधवार १६ मार्च रोजी सकाळी उघडकीस आला आहे. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.
बुधवारी सकाळी घरातील कोणीच लवकर उठले नसल्याने शेजारील व्यक्तींनी घराचे दार आत लोटून पाहिले असता शंकरराव रिक्षे व सारजाबाई रिक्षे हे रक्तभंबाळ अवस्थेत आढळून आले. तर गिरजाबाई आडकिणे या बाजूला जखमी अवस्थेत दिसून आल्या. याची माहिती नागरीकांनी तात्काळ पोलीस स्टेशनला दिली.