बीजिंग, चीन :

पूर्व लडाख भागात भारत आणि चीनमध्ये सुरू असलेल्या वादादरम्यान चीननं नवा दावा केलाय. गलवान खोरं, पँगाँग आणि हॉट स्प्रिंग भागातून चिनी लष्कराला हटवण्यात आल्याचा दावा चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं केलाय.

एका इंग्रजी वर्तमानपत्राशी बोलताना चिनी परराष्ट्र मंत्रालयानं हा दावा केला आहे. पीपल्स लिबरेशन आर्मीच्या जवानांनी नियंत्रण रेषेलगतचा भौगोलिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा असलेला हॉट स्प्रिंग भाग रिकामा केल्याचं चीननं म्हटलंय.

मात्र लडाखमधील घडामोडींकडे लक्ष ठेवून असलेल्या तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, चीनचा हा दावा धादांत खोटा आहे. पूर्व लडाख भागातील सर्व वादग्रस्त भाग अद्यापही चीनकडून रिकामे करण्यात आलेले नाहीत.

गलवान संघर्षानंतर… चिनी परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच भारत भूमीवर पाऊल ठेवणार?
PM Imran Khan: पाकिस्तान पंतप्रधानांना मोठा झटका, सहकारी पक्षाचं विरोधकांना सहकार्य?
भारत आणि चीन दरम्यान गेल्या दोन वर्षांपासून वाद सुरू आहे. हा तणाव निवळण्याच्या दृष्टीने दोन्ही देशांत राजनैतिक आणि लष्करी स्तरावर चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पडल्या आहेत. परंतु, हा वाद अद्याप पूर्णत: संपुष्टात आलेला नाही.

पँगाँग सरोवराचा दक्षिण किनारा आणि गोगरा भागातील चीनच्या डिसएन्गेजमेंटची भारताकडून पुष्टी करण्यात आलीय. मात्र, हॉट स्प्रिंगच्या सर्व वादग्रस्त जागांवर चीननं अद्यापही ताबा सोडलेला नसल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे.

गेल्या ११ मार्च रोजी भारत आणि चिनी लष्करी उच्च अधिकाऱ्यांदरम्यान १५ व्या फेरीत चर्चा पार पडली होती. त्यानंतर एक संयुक्त वक्तव्य जाहीर करण्यात आलं होतं. यानुसार, गेल्या वर्षीपासून दोन्ही देशांच्या लष्करानं गलवान खोरं, पँगाँग सरोवर आणि हॉट स्प्रिंग भागात काही प्रमाणात डिसएन्गेजमेंट प्रक्रिया राबवण्यात आलीय. पूर्व लडाखमध्ये सद्य स्थिती स्थिर आणि नियंत्रणात असल्याचं दोन्ही बाजूंनी म्हटलंय.

डिसएन्गेजमेंट प्रक्रिया ४ आणि ५ ऑगस्ट रोजी पार पडली. यावेळी गोगरा आणि पेट्रोलिंग पॉईंट १७ ए मधून लष्कराला माघारी बोलावण्यात आलं. चर्चेच्या बाराव्या फैरीत दोन्ही देशांनी यासाठी मान्यता दिली होती.

India Russia: रशियाकडून भारताला होणाऱ्या शस्त्रनिर्यातीत घट, SIPRI चा अहवाल
Russia Ukraine War: रशिया युक्रेन युद्ध संपुष्टात येण्याची चिन्हं, झेलेन्स्की यांनी दिले शुभसंकेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here