औरंगाबाद : नात्यातील एका महिलेला मारहाण केल्या प्रकरणी वैजापुर तालुक्याचे शिवसेना आमदार रमेश बोरनारे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण, आता आमदार बोरनारे यांच्यावर याप्रकरणी विनयभंगची कलमं लावण्यात आली आहे. पीडित महिलेच्या पुरवणी जवबावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका कार्यक्रमासाठी वैजापूरात आले असताना आमदार बोरनारे आणि त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांनी मारहाण केल्याचा आरोप करत आमदारांच्या नात्यातील एका महिलेने वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. पण आपला विनयभंग झाला असल्याचा आरोप सुध्दा या महिलेने केला होता. त्यानंतर पोलिसांनी महिलेचा पुरवणी जवाब नोंदवत आता आमदार बोरनारे यांच्यावर विनयभंगाची कलमे लावण्यात आली आहे.

भयंकर! घरातच पती-पत्नीची गळा चिरून निघृण हत्या, खोलीत आणखी एक व्यक्ती होती पण…

पोलीस अधीक्षकांशी चर्चा करणार : चित्रा वाघ

आम्ही यापूर्वीच आरोपीविरुद्ध विनयभंगाच्या कलम ३५४-बी सह कलम ३२६ चा गुन्हा नोंदविण्याची मागणी केली होती. मात्र, राजकीय दबावाखाली जामीनपात्र कलमे लावण्यात आली. तसेच जी कलमे वाढवण्यात आली आहे. त्यावरही आपण असमाधानी असून, याबाबत पोलीस अधीक्षक यांच्यासोबत चर्चा करणार असल्याचं चित्रा वाघ म्हणाले आहेत.

नागरिकांनो काळजी घ्या! पुढील चार दिवस विदर्भात उष्णतेच्या लाटेची शक्यता

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here