वॉशिंग्टन, अमेरिका :

अमेरिकेतील ६५ वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या नागरिकांना कोविड लसीच्या दुसरा बुस्टर डोस देण्यासाठी आपात्कालीन परवानगी देण्यात यावी, अशी मागणी ‘फायजर‘ आणि ‘बायोएनटेक‘नं संयुक्तरित्या यूएस औषध नियामकाकडून औपचारिकपणे केलीय.

आपल्या या मागणीला इस्राईलकडून करण्यात आलेल्या दोन अभ्यासांचा आधार असल्याचंही कंपन्यांनी आपल्या निवेदनात म्हटलंय. या अभ्यासांनुसार, एमआरएनए बूस्टर डोसमुळे रुग्णांत रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत होते. सोबतच, करोना संक्रमण आणि गंभीर आजारांचा परिणामही कमी होतो.

ओमिक्रॉनची लाट ओसरल्यानंतर अनेक देशांमध्ये करोनाच्या रुग्णसंख्येत कमालीची घट झाल्याचं दिसून येतंय, किंवा ही संख्या स्थिर झालीय. तर काही देशांत कोविड निर्बंध उठवल्यानंतर रुग्णसंख्येत वाढ झाल्याचं दिसून आलं. याचाच अर्थ, याआधी घेण्यात आलेल्या करोना लसीच्या डोसचा प्रभाव रुग्णांत कमी होताना दिसून येतोय.

Covid19: चीनमध्ये करोनाच्या BA.2 व्हेरियंटचा फैलाव, भारताची चिंताही वाढणार?
Russia Ukraine War: रशिया युक्रेन युद्ध संपुष्टात येण्याची चिन्हं, झेलेन्स्की यांनी दिले शुभसंकेत
फायझर आणि बायोएनटेक यांनी ज्या इस्रायली अभ्यासाचा हवाला दिलाय त्यात, अतिरिक्त बूस्टर डोस घेतलेल्या व्यक्तींमध्ये करोना संक्रमित रुग्णांसंख्येचा दर दोन पटींना कमी झालेला दिसून आला तर गंभीर आजाराचा दर चार पटींनी कमी होताना दिसला. ज्यांना पहिल्या बूस्टर डोसनंतर चार महिन्यांनी दुसरा बूस्टर डोस मिळाला अशा ६० वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या नागरिकांसाठी हे विश्लेषण मर्यादित होतं.

तर दुसरा एक अभ्यास १८ वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या इस्रायली आरोग्य कर्मचाऱ्यांवर करण्यात आला. ज्या नागरिकांना दुसरा बूस्टर मिळाला त्यांच्या शरीरात अँटीबॉडीजचं प्रमाण अधिक असल्याचं आढळून आलं, असं या अभ्यासाच्या विश्लेषणात म्हटलं गेलंय.

लसीचे अतिरिक्त बूस्टर डोस मिळालेल्या व्यक्तींना करोनापासून सुरक्षेविषयीची अधिक चिंता नसल्याचंही या अभ्यासात दिसून आलं. फायजर-बायोएनटेकच्या लसीचे सुरूवातीला दोन डोस देण्यात येतात. त्यामुळे या लसीचा दुसरा बूस्टर डोस अनेकांसाठी करोना लसीचा चौथा डोस ठरेल.

India China: लडाखच्या गलवान खोरं, पँगाँग सरोवर, हॉट स्प्रिंग भागाबद्दल चीनचा नवा दावा
गलवान संघर्षानंतर… चिनी परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच भारत भूमीवर पाऊल ठेवणार?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here