जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीत निवडणुकीच्या राजकारणावर सत्ताधारी प्रस्थापितांच्या मदतीने फेसबुक आणि इतर सोशल मीडियाद्वारे प्रभावी उपयोग केला जात आहे. यामुळे त्यांचा पद्धतशीरपणे प्रभाव संपवावा, अशी आपली सरकारकडे मागणी आहे. देशातील लोकशाही आणि सामाजिक एकोपा जपला पाहिजे, यावर सोनियांनी यावेळी भर दिला.
फेसबुकवर प्रातिनिधिक जाहिरातदारांची विषारी प्रणाली फोफावत आहे आणि आपल्या देशाच्या निवडणूक कायद्यांची पायमल्ली केली जात आहे, असा आरोप करत सोनियांनी आंतरराष्ट्रीय मीडिया समूह अल जझीरच्या वृत्ताचे उदाहरण दिले. फेसबुक स्वतःचे नियम मोडत आहे आणि सरकारविरोधात बोलणाऱ्यांचा आवाज पूर्णपणे दाबला जात आहे, असे त्या म्हणाल्या.
sanjay raut : भाजपला आव्हान देण्याची तयारी; संजय राऊतांचे काँग्रेसबद्दल मोठे वक्तव्य, म्हणाले…
फेसबुकद्वारे ज्या प्रकारे प्रस्थापितांच्या किंवा सत्ताधाऱ्यांच्या संगनमताने उघडपणे सामाजिक सलोखा बिघडवला जात आहे तो आपल्या लोकशाहीसाठी धोकादायक आहे. भावनिक उत्तेजक प्रचार आणि प्रातिनिधिक जाहिरातींद्वारे तरुण आणि वृद्धांच्या मनात द्वेषाची भावना निर्माण केली जात आहे. फेसबुकसारख्या कंपन्यांना याची जाणीव आहे आणि ते त्यातून नफा कमवत आहेत, असे त्या पुढे म्हणाल्या.
मोठ्या कॉर्पोरेट कंपन्या, सत्ताधारी संस्था आणि Facebook सारख्या जागतिक सोशल मीडिया कंपन्या यांच्यात कसे संगनमत वाढत आहे हे मीडिया रिपोर्ट्समधून समोर येत आहे. ही पक्षीय राजकारणाच्या पलीकडची बाब आहे. सत्तेत कोणीही असो आपली लोकशाही आणि सामाजिक सौहार्दाचे रक्षण केले पाहिजे, असे आवाहन सोनिया गांधींनी केले.