गोविंद तुपे / सुशांत पाटील / मुंबई : MHADA Biggest Scam : गृहनिर्माण खात्याला हादरवणारी बातमी. म्हाडात रिडेव्हलपमेंट्च्या इमारतीतल्या घरांचा मोठा घोटाळा ‘झी 24 तास’ इन्व्हेस्टीगेशनमध्ये उघड झाला आहे. (Scam of Houses in MHADA Redevelopment Building) सुमारे 1200 कोटींचा हा घोटाळा असून यात म्हाडातल्या बाबूंना हाताशी धरून दलालांनी हजारो घरांवर डल्ला मारल्याचे समोर आले आहे. (MHADA  Home) 

खाबुगिरी करणाऱ्या बाबूंनी आणि दलालांनी घरं लाटताना मेलेल्या लोकांनाही सोडलेले नाही. ‘झी 24 तास’च्या इन्व्हेस्टीगेशनमध्ये अनेक धक्कादायक बाबींचा पर्दाफाश झालाय. अधिकारी आणि दलालांच्या संगनमतानं एकाच व्हॅकेशन नोटीसीच्या नंबरवर अनेकांनी गरिबांची घरं लाटल्याचं उघड झाले आहे.

आता बोगस लाभार्थी केवळ कागदपत्रांची फेरफार करूनच घरांवर डल्ला मारत नाहीत तर म्हाडामधील बाबूंना हाताशी धरून मेलेल्यांनाही जिवंत करून घरे लाटत असल्याचे पुढे आले आहे. प्रत्यक्षात मेलेल्यांच्या टाळूवरचे लोणी खाणारे म्हाडात जन्माला आल्याचा प्रत्यय आला आहे. म्हाडातल्या या सर्व घोटाळ्यांचा पर्दाफाश करणारा ‘झी 24 तास’ इन्व्हेस्टीगशनचा हा रिपोर्ट.  
 
म्हाडात हा घोटाळा नेमका कसा होतो. घरं खशी दिली जातात, ही सर्व माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. दशकभरापासून सुरू असलेला हा तब्बल 1200 कोटी रुपयांचा घोटाळा आहे. तसेच म्हाडामध्ये काही प्रचलित शब्द आहेत. या शब्दांचा नेमका अर्थ काय, ते समजून घेतले पाहिजेत. त्यानंतर धक्कादायक माहिती पुढे समजत जाते. 

पुनर्रचित इमारतींमधील घरांसाठी नेमकी पात्रता काय? ही घरं कशी वाटली जातात? घरांचं वाटप कोण करतं ? घरांचा हा घोटाळा नेमका कसा केला जातो? याची माहिती जाणून घ्या.

ऑपरेशन म्हाडा माफिया, ‘झी 24 तास’ इन्व्हेस्टीगेशन 

किती हजार कोटींचा घोटाळा?  
– सुमारे 1200 कोटी 

आर आर म्हणजे काय? 
– आर आर म्हणजे पुनर्रचित गाळे

टीसी म्हणजे काय?  
– टीसी म्हणजे संक्रमण शिबीर
मुंबईत म्हाडाची 56 संक्रमण शिबिरे आहेत
 
एम बी आर आर बी म्हणजे काय?  
– मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ
शॉर्टकट भाषेत म्हाडामध्ये याचा ‘आरबी’ असा उल्लेख केला जातो

 घरांसाठी पात्रता काय? 

–  मूळ उपकरप्राप्त इमारतीचा रहिवासी असणे गरजेचे आहे
– इमारत पडल्याबाबत किंवा इमारत खाली करण्याबाबत कार्यकारी अभियंता यांच्याकडून आलेली नोटीस त्या व्यक्तीकडे असणे गरजेचे आहे
– पुरावा म्हणून ग्राह्य धरली जाणारी जुनी कागदपत्रे सादर करणे गरजेचे. उदा. लाईट बिल, आधार कार्ड, मतदार यादीतील नाव किंवा इतर पुरावे

घरं कशी वाटली जातात? 

– सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर खाली केलेल्या किंवा पाडलेल्या जुन्या इमारतीतील रहिवाशांना संक्रमण शिबिरात गाळे दिले जातात
 – त्यानंतर म्हाडाच्या मास्टर लिस्टमध्ये फॉर्म भरून नाव नोंदणी केली जाते
– त्यानंतर मग सुनावणीसाठी बोलावले जाते.
– सुनावणीच्या वेळी बृहत सूची कमिटी उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे पात्रता निश्चित करते

घरांचं वाटप कोण करतं ?  

– उपमुख्य अधिकारी, संक्रमण शिबीर
– उपमुख्य अधिकारी, पुनर्रचित गाळे
– सहायक उपमुख्य अधिकारी
– विधी सल्लागार
– कार्यकारी अभियंता

घोटाळा कसा केला जातो? 

– सुरुवातीला बोगस कागदपत्रं बनवली जातात. त्यामध्ये व्हॅकेशन नोटीस, जुन्या भाडे पावत्यांचा समावेश असतो
– या बोगस कागदपत्रांच्या आधारे अधिकाऱ्यांशी संगनमत करून संक्रमण शिबिरात तात्पुरत्या स्वरूपात घर दिलं जातं
– त्यानंतर पात्रता निश्चित करून पुनर्रचित बिल्डिंगमध्ये घर घेण्यासाठी अर्ज केला जातो
– आलेल्या अर्जावर बृहत सूची कमिटी सुनावणी घेऊन घर देण्याचे आदेश जारी करते
– त्यानंतर नव्याने बांधलेल्या बिल्डिंगमध्ये किती मोक्याचे फ्लॅट शिल्लक आहेत, याची माहिती म्हाडा अधिकाऱ्यांकडून गुपचूप या बोगस लाभार्थ्याला देण्यात येते
– त्यानंतर बोगस लाभार्थी सदर इमारतीत मोकळा असलेला फ्लॅट मला मिळावा अशी मागणी करणारा अर्ज करतो
– आणि मुंबईतील करोडो रुपये किमतीचा हायप्रोफाईल सोसायटीमधील फ्लॅट बोगस लाभार्थ्याला वितरित करण्यात येतोZee24 Taas: Maharashtra News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here