औरंगाबाद : जिल्ह्यातील धुळे सोलापूर महामार्गावर एका भीषण अपघात समोर आला असून ज्यात एका शेतकऱ्याच्या तब्बल १४ मेंढ्या जागीच ठार झाल्या आहेत. हा अपघात इतका भीषण होता की मेंढ्यांचा अक्षरशः चेंदामेंदा झाला आहे. यामुळे शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका बसला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बंडू वीर हे शेतकरी औरंगाबाद सोलापूर महामार्गावर निपाणी फाट्यावर आपल्या २२ मेंढ्या घेऊन रस्ता ओलांडत होते. याचवेळी एक विटाने भरलेला ट्रक भरधाव वेगाने त्यांच्या दिशेने येत होता. ट्रकचा वेग जास्त असल्याने शेतकऱ्याने त्याला हात करून वेग कमी करण्याचा इशाराही केला. मात्र, ट्रकच्या ड्रायव्हरला नियंत्रण मिळवता आलं नाही आणि त्याने ट्रक थेट मेंढ्यांच्या कळपावर घातला. ज्यात २२ पैकी १४ मेंढ्यांच्या जागीच मृत्यू झाला. तर याबाबत माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. तर नागरिकांनी पकडून ठेवलेल्या ट्रक ड्रायव्हरला ताब्यात घेतले आहे.

‘मटा ऑनलाईन’चा मोठा इम्पॅक्ट: कॉपी पुरवणाऱ्या ‘त्या’ शाळेची मान्यता अखेर रद्द; शिक्षणमंत्र्यांची घोषणा
शेतकऱ्याचं मोठं नुकसान…

बंडू वीर यांनी हलाखीच्या परिस्थितीत थोडं-थोडं करत आपल्या मेंढ्या एकाच्या दोन, दोनच्या चार करत वाढवल्या. मात्र, अचानकपणे अपघातात १४ मेंढ्या जागीच ठार झाल्याने त्यांच्यावर मोठं आर्थिक संकट कोसळलं आहे. त्यामुळे आता हे नुकसान कसे भरून काढायचं असा प्रश्न त्यांना पडला आहे. तर लेकराप्रमाणे जपलेल्या प्राण्यांना रस्त्यावर चेंदामेंदा अवस्थेत पाहून त्यांच्या डोळ्यात अश्रू आले.

शिवसेनेला मोठा धक्का, महिलेला मारहाण प्रकरणी आमदारावर विनयभंगाचा गुन्हा दाखल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here