औरंगाबाद : दहावीच्या परीक्षेत मुलांना कॉपी पुरवणाऱ्या औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील निलजगाव येथील लक्ष्मीबाई माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेची अखेर मान्यता रद्द करण्यात आली आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबत विधान परिषदेत घोषणा केली आहे. हा सर्व प्रकार ‘महाराष्ट्र टाईम्स’ने काल (मंगळवारी) समोर आणला होता. दहावीच्या पहिल्याच पेपरला शिक्षकच विद्यार्थ्यांना कॉपी पुरवत असल्याचं मटाच्या कॅमेरात कैद झालं होतं.

शाळेची मान्यता रद्द, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा

राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड विधान परिषदेत बोलताना म्हणाल्या, “मंगळवारी दहावीच्या मराठी विषयाच्या परीक्षेदरम्यान लक्ष्मीबाई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, (नीलजगाव, ता. पैठण) येथे झालेल्या गैरप्रकाराबाबत प्राथमिक चौकशीअंती मुख्याध्यापक, सहशिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी हे विद्यार्थ्यांना कॉपी पुरवीत असल्याचे महाराष्ट्र टाइम्स यांनी केलेल्या बातमीमुळे निदर्शनास आले. त्यामुळे सदर प्रकरणी शाळेची मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. असा गैरप्रकार इतर शाळेत आढळल्यास त्यांच्यावरही अशी सक्त कारवाई केली जाईल”

हाच तो व्हिडीओ…


असा सुरु होता कॉपीचा प्रकार….

प्रश्नपत्रिकांचे उत्तर गाईड्स मधून काढून कार्बन लावून प्रति तयार केल्या जात होत्या. त्यानंतर त्या कॉपी शिक्षक विद्यार्थ्यांना पुरवत होते. मात्र माध्यम प्रतिनिधी केंद्रावर येताच एक शिक्षक कार्बन कॉपी आणि गाईड्स घेऊन पळू लागले. तसेच उत्तर लिहलेली पत्रिका सुद्धा लपवण्याचा प्रयत्न करत होते. त्यांना याबाबत विचारणा केली असता मोबाईल शूटिंग बंद करण्यास सांगितले.

मटा ऑनलाईनचं स्टिंग ऑपरेशन

maharashtra Education minister varsha gaikwad announced Recognition of auranagabad Paithan Nilajgaon Laxmibai School

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here