मुंबई : इकडच्या-तिकडच्या योजना आणल्या, केंद्रातीलच योजना या अर्थसंकल्पात होत्या, असं विरोधी पक्ष बोलत होते. मला कळत नाही यांना ‘येड पांघरूण, पेडगावला जायचं होतं’ की, त्यांचा ‘अभ्यास कमी होता’ म्हणून अर्थसंकल्पावर टीका करत होते, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज, विरोधकांना लगावला. अर्थसंकल्पावरील चर्चेवर विधानसभेत उत्तर देताना अजित पवार यांनी ‘सत्य आम्हा मनी, नव्हे गबाळाचे धनी, देतो तीक्ष्ण उत्तरे, पुढे व्हावयाची बरे,’ या संत तुकारामांच्या अभंगाने सुरुवात केली.

राज्य अडचणीतून पुढे जात असताना, राज्याला कर्जातून बाहेर काढताना महसुली तूट कशी कमी करता येईल, नागरिकांवर कराचा भार पडता कामा नये व राज्याचा गाडा सुरळीत चालेल, विकासाला खीळ बसणार नाही, असा प्रयत्न या अर्थसंकल्पात केल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.

Devendra Fadnavis – Eknath Khadse : फडणवीसांच्या ‘पेन ड्राइव्ह बॉम्ब’नंतर ‘सीडी’ कधी येणार? एकनाथ खडसे म्हणाले…
प्रविण दरेकरांच्या अडचणीत भर; गुन्हा रद्द करण्याची याचिका हायकोर्टाने फेटाळली

सरकार आणण्याचा प्रयत्न करताय ठीक आहे, परंतु ठराविकांना जास्त पैसे दिले असं बोलून काय होणार आहे का? असा टोलाही अजित पवार यांनी फडणवीस यांना लगावला. अटलबिहारी वाजपेयी यांचेही २१ पक्षांचे सरकार होते याची आठवणही अजित पवार यांनी यावेळी करून दिली.

‘द कश्मीर फाइल्स’ सिनेमाला करमुक्त करा, अशी मागणी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी केली होती. यावर बोलताना अजित पवार यांनी मिशन मंगल, तानाजी, पानिपत हे सिनेमे करमुक्त केल्याची आठवण करून देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘ द कश्मीर फाइल्स’ सिनेमाचा उल्लेख केला. त्यामुळे केंद्राने हा सिनेमा करमुक्त करण्याचा निर्णय घेतला. तर संपूर्ण देशालाच लागू होईल. अगदी जम्मू – काश्मीर ते कन्याकुमारीपर्यत करमुक्त होईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत असतानाच विरोधी पक्षाच्या सदस्यांनी आक्षेप घेतला; मात्र अजित पवार यांचे बोलणे झाल्याशिवाय बोलायला दिले जाणार नाही, अशी भूमिका तालिका अध्यक्षांनी घेतल्याने विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभात्याग केला. त्यावेळी सत्ताधारी सदस्यांनी ‘पळाले रे पळाले’ म्हणत ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ … ‘जय भवानी जय शिवाजी’ अशा जोरदार घोषणा दिल्या.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व आमदारांना ५ कोटींचा विकासनिधी, तर आमदारांच्या चालकाला २० हजार रुपये आणि आमदारांच्या स्वीय सहाय्यकाला ३० हजार रुपये देणार असल्याची घोषणा केली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारने घेतलेल्या निर्णयाबद्दल माहिती देतानाच शेतकऱ्यांच्या बाजूने महाविकास आघाडी सरकार नाही, या आरोपांचे खंडन करताना शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजनांची आकडेवारी सभागृहात मांडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here