पुणे : खरेदी केलेल्या जमिनीची सातबारा उताऱ्यावर नोंद घेण्यासाठी २० हजार रूपयांची लाच घेताना तलाठ्याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) बुधवारी अटक केली. याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. वर्षा मधुकर धामणे (वय ४५, सजा-म्हाळुंगे) असं लाच घेताना अटक केलेल्या महिला तलाठ्याचं नाव आहे. (Pune Bribe Case)

वर्षा धामणे यांच्याकडे खेड तालुक्यातील आंबेठाण सजाचा अतिरिक्त कारभार आहे. या प्रकरणात खासगी व्यक्ती अकबर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ३२ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली होती. तक्रारदार यांनी म्हाळुंगे येथे २०१७ मध्ये जमीन खरेदी केली होती. त्या जमिनीची सातबारा उताऱ्यावर नोंदणी करण्यासाठी त्यांनी म्हाळुंगे सज्जा येथे अर्ज केला होता.

राजू शेट्टी लवकरच मोठी घोषणा करणार?; महाविकास आघाडीला धक्का देण्याची तयारी

सुरुवातीला या जमिनीची नोंद करण्यासाठी खासगी व्यक्ती अकबर याने १ लाख रूपयांच्या लाचेची मागणी केली. त्यानंतर आरोपी धामणे यांनी ही नोंद सातबारा-उताऱ्यावर करण्यासाठी ३० हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदार यांनी एसीबीकडे तक्रार दिली. त्या तक्रारीची पडताळणी केली आणि त्यावेळी लाच मागितल्याचं निष्पन्न झाले. त्यानुसार खेड तालुक्यातील आंबेठाण येथे सापळा रचून २० हजार रूपयांची लाच घेताना धामणे याना पकडण्यात आले.

दरम्यान, याप्रकरणी पोलीस निरीक्षक ज्योती पाटील या अधिक तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here