पुणे : टेलरने मारहाण करून ग्राहकाच्या पोटात कात्री खुपसल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पँट अल्टर केल्यानंतर बिलाच्या रकमेवरून झालेल्या वादातून हा प्रकार घडल्याची माहिती आहे.

या प्रकरणी अजय प्रभाकर पायाळ (वय २४, रा. वडगावशेरी) यांनी चंदननगर पोलीस (Chandan Nagar Police) ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून साकिब अन्सारी (वय २१) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार वडगाव शेरीच्या आनंदपार्क येथील मुज्जमिल टेलर शॉप येथे १५ मार्चला दुपारी अडीचच्या सुमारास घडला.

राजू शेट्टी लवकरच मोठी घोषणा करणार?; महाविकास आघाडीला धक्का देण्याची तयारी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुज्जमिल टेलर शॉप येथे काम करतो. तक्रारदार आणि त्याचा मित्र पँट अल्टर करण्यासाठी मुज्जमिल टेलर शॉपमध्ये गेले होते. तेथे तक्रारदाराची पँट अल्टर करून घेतली. त्याच्या बिलावरून तक्रारदार आणि आरोपींमध्ये वाद झाला. त्यामुळे आरोपीने तक्रारदाराला शिवीगाळ करून स्टूल कपाळावर मारला. तसंच, शॉपमधील कात्री तक्रारदाराच्या पोटात खुपसली. यात तक्रारदार जखमी झाला, असं तक्रारीत नमूद आहे.

दरम्यान, या घटनेप्रकरणी चंदननगर पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here