उल्हासनगरमध्ये महिलेची किरकोळ कारणावरून हत्या करण्यात आली. आरोपी हा महिलेशी लग्न करणार होता. मात्र, त्यांच्यात वारंवार वाद होत होते. याच वादातून आरोपीने तिची हत्या केली.

हायलाइट्स:
- उल्हासनगरमध्ये धक्कादायक घटना
- महिलेची भिंतीवर डोके आपटून केली हत्या
- आरोपी फरार, शोधासाठी पोलीस पथक रवाना
मिळालेल्या माहितीनुसार, सुकन्या आव्हाड असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. सुकन्या हिच्या पतीचे सात वर्षांपूर्वीच निधन झाले. ती मुलांसोबत चिंचपाडा परिसरात राहत होती. काही दिवसांपासून सुकन्याची अनिल भातसोडे याच्यासोबत ओळख वाढली. दोघे लग्नही करणार होते. अनिलचे तिच्या घरी येणे-जाणेही वाढले होते. अनिल हा वारंवार सुकन्याकडे पैशांची मागणी करत असे. यातून दोघांमध्ये वाद होत होते. १२ मार्च रोजी अनिल आणि सुकन्या यांच्यात किरकोळ वाद झाला. त्यावेळी अनिलने सुकन्याला बेदम मारहाण केली. तिचे डोके भिंतीवर आपटले. हा सगळा प्रकार सुकन्याच्या मुलीने बघितला. ती घराबाहेर मोबाइलमध्ये व्हिडिओ गेम खेळत असताना, तिला घरातून सुकन्याच्या ओरडण्याचा आवाज आला. तेव्हा घरात डोकावून पाहिले असता, अनिल हा तिच्या आईचे डोके भिंतीवर आपटत होता. यात सुकन्या गंभीर जखमी झाल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोपी अनिल फरार झाला. आता सुकन्याच्या मुलीने दिलेल्या तक्रारीवरून विठ्ठलवाडी पोलिसांनी आरोपी अनिल भातसोडे याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपीच्या शोधासाठी पथक रवाना करण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
या बातम्यांबद्दल अधिक वाचा
Web Title : ulhasnagar crime woman killed by her boyfriend after quarrel
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Marathi News from Maharashtra Times, TIL Network