Maharashtra Beed Crime News : बीड जिल्ह्यामधील वाळू माफियांच्या विरोधात कारवाई करणाऱ्या पोलिसांवरच ते वाळूमाफिया हल्ल्याचा प्रयत्न करत असल्याच्या यापूर्वीसुद्धा अनेक घटना घडल्या आहेत. आता पुन्हा एकदा वाळू माफिया आणि थेट पोलीस हवालदाराच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. याप्रकरणी तीन वाळू माफियां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बीडमधील ही घटना गेवराई तालुक्यातील खामगाव आणि सावरगाव परिसरातील गोदावरी नदी पात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर छापा टाकताना घडली आहे. सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने या परिसरामध्ये पाच वाहनांसह 19 ब्रास वाळू असा एकूण तीन कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. विशेष म्हणजे सकाळी सात वाजता ही कारवाई करण्यात आली.

पोलिसांनी छापा टाकताच वाळू माफियांचा ट्रॅक्टर अंगावर घालण्याचा प्रयत्न

गेवराई तालुक्यातील खामगाव परिसरात गोदावरी नदीच्या पात्रात साठवून ठेवलेली वाळू घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. आणि त्यावरून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी गोदावरी नदीच्या पात्रात एका ट्रॅक्टरमध्ये ते अगदी वाळू भरली जात असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. यावेळी या पोलीस पथकातील खबरदार बालाजी दराडे आणि राजू वंजारे यांनी ट्रॅक्टरकडे धाव घेतली. मात्र त्याचवेळी ट्रॅक्टर चालकानं ट्रॅक्टर अंगावर घालण्याचा प्रयत्न करत तिथून पळ काढला. यावेळी प्रसंगावधान साधून हे दोन्ही पोलीस बाजूला झाले. मात्र इथं वाळू भरणाऱ्या दोघांनी हातामध्ये वाळू भरण्याचं खोरं या दोन पोलिसांकडे फिरवण्याचा प्रयत्न केला आणि तिथून पोबारा केला.

दरम्यान, पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करणारा ट्रॅक्टर चालक अनिल उर्फ अण्णा साळुंके, त्यानंतर सचिन उर्फ बँजो अंकल साळुंखे आणि आसमान उर्फ पप्पू या तिघांवर गेवराई पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करणारे हे तिन्ही आरोपी जालना जिल्ह्यातील आहेत. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

High Court : …तरीदेखील बलात्कार समजला जाईल, हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

Thane Crime : वडिलांसह मुलीनं संपवलं जीवन; चिठ्ठीत पोलीस अधिकाऱ्याचं नाव, पोलीस दलात खळबळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here