नवी दिल्ली :

करोना संक्रमणानं गेल्या दोन वर्षांपासून जगाला हैराण करून सोडलंय. दोन वर्ष उलटल्यानंतरही संक्रमण थांबण्याचं नाव काही घेताना दिसत नाही. याउलट चीनसारख्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशात करोना संक्रमितांची संख्या वेगानं वाढताना दिसून येतेय. याच दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेकडून जगाला करोना संक्रमणाच्या आणखी एका लाटेचा इशारा देण्यात आलाय. येणाऱ्या काही दिवसांत करोना रुग्णांची संख्या मोठी उसळी घेण्याची शक्यता जागतिक आरोग्य संघटनेनं व्यक्त केलीय.

न्यूज एजन्सी एएनआयनं दिलेल्या माहितीनुसार, जगभरात अचानक करोना रुग्णांची संख्या उसळी घेऊ शकते, असा इशारा डब्ल्यूएचओकडून देण्यात आलाय. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे, करोना चाचण्यांची संख्या आता कमालीची घटलीय तसंच गेल्या काही आठवड्यांत करोना रुग्णांच्या संख्येतही घट दिसून आलीय.

याशिवाय, जगातील कोणत्या भागांत करोना रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे, याचा अंदाजदेखील डब्ल्यूएचओकडून व्यक्त करण्यात आलाय. आशियातील अनेक देशांत करोना रुग्णांची संख्या वाढताना दिसून येऊ शकते, असं डब्ल्यूएचओनं म्हटलंय. चीनसारख्या देशांत डब्ल्यूएचओचा हा अंदाज खरा ठरताना दिसून येतोय.

करोना लसीचा दुसरा बूस्टर डोस, ‘फायजर’कडून मंजुरीसाठी अर्ज दाखल
Covid19: चीनमध्ये करोनाच्या BA.2 व्हेरियंटचा फैलाव, भारताची चिंताही वाढणार?
चीनमध्ये पुन्हा एकदा वाढत्या करोना रुग्णांच्या संख्येनं देशाच्या चिंतेत भर घातलीय. यामुळे अनेक भागांत लॉकडाऊनही लावण्यात आलंय तसंच देशात करोना नियमांची कडक अंमलबजावणी सुरू करण्यात आलीय. चीनमध्ये ओमिक्रोनचा सब-व्हेरियंट BA.2 आढळून आला आहे. याच सब-व्हेरियंटमुळे रुग्णांच्या संख्येत अचानक वाढ झाल्याचं म्हटलं जातंय.

चीनशिवाय इस्राईलमध्येही ओमिक्रॉन सब-व्हेरियंट BA.2 च्या दोन रुग्णांची पुष्टी झालीय. हा सब-व्हेरियंट कोविड-१९ च्या ‘BA.1’ आणि ‘BA.2’ या व्हेरियंटच्या मिश्रणातून तयार झाल्याचं सांगण्यात येतंय. या व्हेरियंटबद्दल अद्याप अधिक माहिती हाती आली नसली तरी हा व्हेरियंट अधिक संक्रामक असून कमी धोक्याचा असल्याचं समोर येतंय.

जगातल्या इतर देशांसहीत भारतातही या व्हेरियंटचा परिणाम पाहायला मिळू शकतो. जून महिन्यापर्यंत भारतात तिसऱ्या लाटेचा परिणाम दिसून येऊ शकतो, असं सांगितलं जातंय. यानंतर केंद्रीय आरोग्य विभागाकडून पूर्वसावधानता बाळगण्यात येतेय. रुग्णांच्या घटत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर भारतात अनेक ठिकामी करोना नियमही हटवण्यात आलेत.

India China: लडाखच्या गलवान खोरं, पँगाँग सरोवर, हॉट स्प्रिंग भागाबद्दल चीनचा नवा दावागलवान संघर्षानंतर… चिनी परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच भारत भूमीवर पाऊल ठेवणार?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here