रत्नागिरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका महिलेचा आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर, रत्नागिरी पोलिसांनी तपास सुरू केला. महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या संशयित तरूणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याला पुण्यातून अटक करण्यात आली. आरोपीला कोर्टात हजर केले असता, त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, २१ मे २०२० रोजी हा धक्कादायक प्रकार घडला होता. या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी त्रिलोकसिंह हयातसिंह कोरंगा (वय ३६, मूळचा राहणार, उत्तराखंड, सध्या बाणेर रोड, बालेवाडी, पुणे) याला अटक केली. त्याला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. २१ मे २०२० रोजी त्याने सोशल मीडियावर एका महिलेचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल केला होता. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक गणेश सावंत यांनी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार, पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा नोंदवला होता. या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत होता. रत्नागिरी पोलिसांनी संशयित आरोपीला पुण्यातून अटक केली. त्याला बुधवारी येथील कोर्टात हजर केले असता, त्याला ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा अधिक तपास रत्नागिरी पोलीस करत आहेत.