नवी दिल्ली: जगभरातील अनेक देशांमध्ये हाहाकार माजवणाऱ्या विषाणूचा भारतातील विविध राज्यांमध्ये झापाट्याने प्रसार होत आहे. याचा परिणाम म्हणून पीपीई अर्थात पर्सनल प्रोटेक्टीव्ह इक्विपमेंट आणि टेस्टिंग किटची मागणी वाढत आहे. हे पाहता पुढील दोन महिन्यांत भारताला २.७ कोटी एन-९५ मास्क, १.५ कोटी पीपीई, १६ लाख टेस्टिंग किट आणि ५० हजार व्हेंटिलेटरची गरज भासणार आहे.

उद्योगक्षेत्रातील प्रतिनिधींशी केली चर्चा
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ एप्रिल या दिवशी नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी उद्योगक्षेत्रातील प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. या बैठकीत भारताला या सर्व महत्त्वाच्या उपकरणांची आवश्यकता भासू शकते याबाबत बैठकीत उपस्थित असलेल्या खासगी क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि आंतरराष्ट्रीय संस्थांना तपशीवार माहिती देण्यात आली.

१६ व्हेंटिलेटर्स उपलब्ध, ३४ हजारांची दिली ऑर्डर

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील काळामध्ये सरकारला किती व्हेंटिलेटर्सची आवश्यकता आहे, असा प्रश्न बैठकीत विचारण्यात आल्यानंतर अधिकाऱ्यांनी बैठकीत व्हेंटिलेर्सची उपलब्धता आणि आवश्यकतेबाबत ही माहिती दिली. या प्रकल्पात गुंतवणूक करण्यासाठी या सर्व गोष्टींची तपशीलवार माहिती असणे आवश्यक असल्याचे बैठकीत उपस्थित असलेल्या प्रतिनिधींनी सांगितले. बैठकीत सादर करण्यात आलेल्या माहितीनुसार भारताला जूनपर्यंत ५० हजार व्हेंटिलेटर्सची गरज भासणार आहे. यां पैकी आता १६ हजार इतके व्हेंटिलेटर्स उपलब्ध आहेत, तर उर्वरित ३४ हजार व्हेंटिलेटर्ससाठी ऑर्डर देण्यात आली आहे.

या बैठकीत कोण उपस्थित होते?
या बैठकीत अमिताभ कांत यांच्या व्यतिरिक्त मुख्य वैज्ञानिक सल्लागार डॉ. विजय राघवन, एनडीएमएचे सदस्य कमल किशोर, सीबीआयसीचे सदस्य संदीप मोहन भटनागर, अतिरिक्त गृह सचिव, अनिल मलिक, पीएमओचे सहसचिव गोपाळ बागले आणि मंत्रिमंडळातील सचिव मंडळातील उपसचिव टीना सोनी उपस्थित होत्या. उद्योगक्षेत्रातून फिक्कीच्या अध्यक्षा डॉ. संगीता रेड्डी, फिक्कीचे वरिष्ठ उपाध्यक्ष उदय शंकर, फिक्कीचे उपाध्यक्ष मेहता, हनी वेलचे अश्विनी चनन आणि महाजन इमेजिंगचे हर्ष महाजन उपस्थित होते.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here