टोकिया, जपान :

गुरुवारी पहाटे पूर्व जपानला भूकंपानं जोरदार झटका दिल्याचं समोर येतंय. या भूकंपात दोन जणांना जीव गमवावा लागल्याची प्राथमिक माहिती हाती येतेय. तर अनेक जण जखमी झाल्याचंही सांगण्यात येतंय. भूकंपासोबतच या भागात त्सुनामीची सूचना देत नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय.

गुरुवारी स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवार-गुरुवारी रात्री उशिरा ७.४ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूंकपाच्या झटक्यानं अनेक नागरिकांना झोपेतून जागं केलं. या भूकंपात देशाच्या पूर्व भागातील नुकसानीच्या आकलनाचं काम अधिकाऱ्यांकडून सुरू करण्यात आलंय.

earthquake in japan

जपानला भूकंपाचा हादरा; दोघांचा मृत्यू

दोघांचा मृत्यू, ९० हून अधिक जखमी

भूकंपात फुकुशिमा भागातील एक तर मियागी भागातील एका नागरिकाचा मृत्यू झाल्याचं समजतंय. सोबतच, ९० हून अधिक जण गंभीर जखमी झाल्याचं समजतंय.

India China: लडाखच्या गलवान खोरं, पँगाँग सरोवर, हॉट स्प्रिंग भागाबद्दल चीनचा नवा दावा


धावती बुलेट ट्रेन रुळावरून घसरली

जपानच्या बुलेट ट्रेन ऑपरेटर कंपनीनं दिलेल्या माहिीतनुसार, तोहोकू भागात एक धावती बुलेट ट्रेन रुळावरून घसरली. या ट्रेनमधून जवळपास १०० प्रवासी प्रवास करत होते. परंतु, या अपघातात कोणताही प्रवासी जखमी झाल्याची माहिती नाही.

जपानच्या ‘ईस्ट निप्पॉन कंपनी‘च्या म्हणण्यानुसार, भूकंपानंतर तत्काळ अनेक एक्सप्रेस-वे वाहतुकीसाठी बंद करण्यात आले. यामध्ये ओसाकीचा तोहोकू एक्सप्रेस-वे, मियागीचा प्रिफेक्चर आणि सोमा-फुकुशिमाचा जोबन एक्सप्रेस-वे यांचा समावेश आहे.

अणु संयंत्राला धक्का नाही

भूकंप ही काही जपानसाठी नवीन गोष्ट नाही. परंतु, इतक्या मोठ्या तीव्रतेच्या धक्क्यानं नागरिकांना आणि सरकारलाही हादरा दिलाय. देशात वारंवार होणाऱ्या भूकंपांमुळे होणारा विध्वंस टाळण्यासाठी इमारतींमध्ये कडक नियम पाळले जातात. सुदैवाची बाब म्हणजे, या भूकंपामुळे अणु संयंत्रांमध्ये कोणतीही असामान्य बाब दिसून आली नाही.

जपानच्या हवामान संस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, हा भूकंप फुकुशिमा किनार्‍यापासून ६० किलोमीटर (३७ मैल) भूगर्भात झाला. त्यानंतर या भागाला ६.१ रिश्टर स्केलचा आणखी एक भूकंपाचा धक्का जाणवला.

earthquake in japan

जपानला भूकंपाचा हादरा

भूकंपानंतर राजधानी टोकियोसहीत इतर अनेक भागात जवळपास २० लाख घरात वाज गेल्यानं अंधार पसरला. परंतु काही वेळातच ही समस्या सोडवण्यात आली. वीज कंपनी TEPCO नं दिलेल्या माहितीनुसार, मियागी आणि फुकुशिमा भागातील जवळपास ३५,६०० घरांमध्ये गुरुवारी सकाळपर्यंत वीज नव्हती.

२०११ सालच्या भूकंपाची अनेकांना आठवण

आज जपानला दिलेल्या भूकंपाच्या हादऱ्यानं अनेकांना २०११ सालच्या भूकंपाची दृश्यं आठवली. ११ मार्च २०११ रोजी जपानला भूकंपानं उद्ध्वस्त केलं होतं. ९ रिश्टर स्केल तीव्रतेच्या या भूकंपाच्या धक्क्यानं ईशान्य जपानच्या किनारपट्टीला धडक दिली. त्यानंतर आलेल्या त्सुनामीत हजारो नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता. आजही जपान या अपघातातून सावरू शकलेला नाही. या भूकंपांच्या आफ्टरशॉकमुळे १८ हजार जणांचा मृत्यू झाला होता.

Ukraine Crisis: युक्रेनियन चॅनलवर दिसला राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्या आत्मसमर्पणाचा व्हिडिओ आणि…
Covid19: ओमिक्रॉन सब-व्हेरियंट BA.2 संक्रमणाबद्दल जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here