इस्लामाबाद, पाकिस्तान :

भारताकडून ‘चुकून’ पाकिस्तानात कोसळलेल्या ब्राह्मोस क्षेपणास्राचा मुद्दा जोर धरतोय. पाकिस्ताननं या घटनेवर तीव्र आक्षेप व्यक्त केला आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मुद्यांवर सीनेटच्या स्थायी समितीच्या अध्यक्ष आणि खासदार शेरी रहमान यांनी या मुद्यावर पाकिस्तान सरकारला धारेवर धरलंय. भारतीय क्षेपणास्र पाकिस्तानात कोसळल्यानंतर पाकिस्ताननं दिलेल्या स्पष्टीकरणावर शेरी रहमान यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करतानाच ‘हा भारताचा पाकिस्तानसाठी स्पष्ट संदेश होता आणि याचे परिणाम अतिशय धोकादायक ठरण्याची शक्यता होता’ अशी टिप्पणी केलीय.

‘दोन शक्तीशाली आणि अणुऊर्जेनं सज्ज देशांत कोणत्याही प्रकारचं शत्रुत्व कोणत्याही किंमतीवर टाळलं जायला हवं. दोन अणुऊर्जा सज्ज देश… ज्यांच्यात चार वेळा युद्ध झालंय… आणि ते एकमेकांचे शेजारी आहेत, अशा प्रकारचं धोकादायक वातावरणाचं इतर कोणतंही उदाहरण जगात नाही’ अशी प्रतिक्रिया शेरी रहमान यांनी केलंय. समितीच्या एका बैठकीची अध्यक्षता करताना केलेल्या भाषणात त्यांनी हे विधान केलंय.

‘या दोन देशांचा इतिहास अत्यंत अशांत राहिलाय. हा इतिहास पाहता भारताच्या तथाकथित चुकीची गंभीरता पाकिस्तान आणि आंतरराष्ट्रीय समुदायाकडून नजरेआड केला जाऊ शकत नाही’ असंही त्यांनी म्हटलंय.

भारताकडून स्फोटक पदार्थांशिवाय ‘चुकीनं’ उडालेलं क्षेपणास्त्र पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादहून ५०० किलोमीटर अंतरावर पडलं. अमेरिका आणि चीन या दोन देशांनंतर आपल्या लष्करावर सर्वाधिक खर्च भारतात केला जातो. मग त्यांच्याकडून इतकी मोठी दुर्घटना ‘चुकीनं’ कशी काय होऊ शकते, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

Japan Earthquake: जपानला भूकंपाचा हादरा; दोघांचा मृत्यू, धावती बुलेट ट्रेन रुळावरून घसरली…
Ukraine Crisis: युक्रेनियन चॅनलवर दिसला राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्या आत्मसमर्पणाचा व्हिडिओ आणि…
भारताचं स्पष्टीकरण

९ मार्च २०२२ रोजी क्षेपणास्त्र युनिटची नियमित देखभालीचं काम सुरू असताना अनावधानाने चुकून क्षेपणास्त्र सुटलं आणि ते उडून पाकिस्तानच्या हद्दीत पडले. सरकारनं ही घटना अत्यंत गांभीर्याने घेतली आहे तसंच औपचारिकरित्या उच्च स्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत, असं स्पष्टीकरण भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी राज्यसभेत दिलं होतं. परंतु, पाकिस्ताननं मात्र भारताच्या या स्पष्टीकरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय.

आपल्यापैंकी अनेक लोकांना असंच वाटतंय ती भारताकडून पाकिस्तानला देण्यात आलेला एक संदेश होता. भारताचा पाकिस्तानप्रती याआधीचा व्यवहार पाहिला तर या प्रकरणातील आंतरराष्ट्रीय समुदायाची चुप्पी निराशाजनक आहे. हे पाहून आम्हाला प्रश्न पडतोय की, पाकिस्तानकडून अशीच घटना चुकीनं घडली असती तर आंतरराष्ट्रीय समुदायानं याच पद्धतीनं प्रतिक्रिया दिली असती का?, असं म्हणत शेरी रहमान आपली निराशाही व्यक्त केली.

Covid19: ओमिक्रॉन सब-व्हेरियंट BA.2 संक्रमणाबद्दल जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा
करोना लसीचा दुसरा बूस्टर डोस, ‘फायजर’कडून मंजुरीसाठी अर्ज दाखल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here