लातूर : नुकताच प्रचंड लोकप्रिय झालेल्या ‘पुष्पा’ चित्रपटातील तो पुष्पाचा डायलॉग तुम्हाला आठवतच असेल. ‘ पुष्पा नाम सुनके फ्लॉवर समझे क्या ? मै फ्लॉवर नहीं फायर हूँ’. अगदी या डायलॉगप्रमाणे काहीसा प्रकार लातूरमध्ये घडला आहे. एका अल्पवयीन मुलीला फ्लॉवर समजण्याची चूक स्वतःला डॉन समजणाऱ्या एका भाईने केली. यानंतर असं काही घडलं, ज्याची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात आहे.


या भाईचं नाव आहे गौस मुस्तफा सय्यद. स्वतःला डॉन म्हणवून घेणारा हा भाऊ लातूर शहरातील विवेकानंद पोलीस ठाण्याच्या परिसरात राहतो. गेल्या काही दिवसांपासून तो दहशत निर्माण करत होता. अनेकवेळा त्याने गरीब नागरिकांवर दाबाव टाकण्याचा प्रयत्न केला. खरंतर, त्याच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यात १८पेक्षा अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलिसांच्या रडारवर तो होताच. पण यावेळी पठ्ठ्याने असं काही केलं की त्याची चांगलीच वरात निघाली.

गोव्याच्या निकालानंतर महाराष्ट्रातील निवडणुकांबाबत देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान; म्हणाले…
गौस मुस्तफा सय्यद याने आपल्याला मारहाण केली असून तो परिसरात दहशत निर्माण करत असल्याची थेट तक्रार पीडित मुलीने विवेकानंद पोलीस ठाण्यात दिली. यानंतर तातडीने गौसची शोधमोहीम सुरू झाली. त्याला शहरातील ज्ञानेश्वर नगर इथून पोलिसांनी ताब्यात घेतलं. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे यावेळी त्याला पोलिसांनी रस्त्याने फटके देत स्टेशनमध्ये आणलं. यावेळी परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.

यानंतर, पुढील कारवाई विवेकानंद पोलीस करत असून अशा भाईगिरीला या प्रकारामुळे चाप बसेल अशी आशा सुजाण नागरिक व्यक्त करत आहेत. तर नागरिकांनी अशा प्रवृत्त्तीला बळी न पडता थेट पोलिसांशी संपर्क करत तक्रार दाखल करावी असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आली आहे.

दगड, दांडे घेऊन दोन गट समोरासमोर भिडले; माजी नगरसेवकासह आठ जखमी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here