मुंबई : राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांची तुरुंगातून सुटका करण्यासाठी एका व्यक्तीने ३ कोटी रुपये मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत मलिक यांचा मुलगा आमिर मलिक याने मुंबईतील विनोबा भावे पोलीस ठाण्यात संबंधित व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली आहे. इम्तियाज असे त्या व्यक्तीचे नाव आहे. मलिक यांना जामीन मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, त्याबदल्यात तीन कोटी रुपये द्यावे लागतील, असे त्या व्यक्तीने सांगितल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

मलिक यांचा मुलगा आमिर याने विनोबा भावे पोलीस ठाण्यात इम्तियाज नावाच्या व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली आहे. नवाब मलिक हे सध्या आर्थर रोड तुरुंगात आहेत. मनी लाँड्रिंग प्रकरणात त्यांच्याविरोधात ईडीने अटकेची कारवाई केली होती. मलिक यांना जामीन मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे इम्तियाजने सांगितले आणि त्याबदल्यात तीन कोटी रुपयांची मागणी केली, असा त्याच्यावर आरोप आहे.

राऊतांना अरेतुरे, ‘ठाकरे’- ‘द कश्मीर फाईल्स’ची तुलना; भाजपचं सेनेच्या जखमेवर मीठ चोळणारं ट्विट!
हिंदुस्थानी भाऊला अटकपूर्व जामीन मंजूर पण एका अटीवर, वाचा नेमकं प्रकरण काय?

नवाब मलिक यांना जामीन मिळवून देण्याच्या बदल्यात इम्तियाजने तीन कोटी रुपयांची मागणी केली. ती बिटकॉइनच्या स्वरूपात देण्यात यावी, असे इम्तियाजने सांगितल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर आमिर मलिक याने त्याच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी प्राथमिक तपास केला असता, दुबईवरून त्यांना यासंबंधी कॉल आल्याचे सांगण्यात येते.

शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना तातडीचं बोलावणं धाडलं; मुंबईत घडामोडींना वेग

मनी लाँड्रिंग प्रकरणात नवाब मलिक यांना ईडीने अटक केली होती. तेव्हापासून ते आर्थर रोड तुरुंगात आहेत. कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमशी संबधित मनी लाँड्रिंग प्रकरणात त्यांना अटक झाली आहे. २३ फेब्रुवारी रोजी ईडीने मलिक यांना अटक केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here