बुलडाण्यातील मलकापूर HDFC बँकेत गेल्या २३ फेब्रुवारीला एका व्यापाऱ्याने ५०० रुपयांच्या ३८ नोटांचा भरणा केला होता. या नोटा खोट्या असल्याचं लक्षात येताच बँकेच्या कॅशीअरने मलकापूर पोलीसात तक्रार दिली होती. यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल करत चौकशीनंतर दोघांना अटकही केली होती. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत एकूण ६ जणांना वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक केली आहे. या सर्वांची चौकशी केल्यानंतर आज मलकापूर पोलिसांनी बुलढाणा जिल्ह्याच्या MIM च्या माजी जिल्हाध्यक्ष सैजाद खान सलीम खान यांनी अटक केली आहे.
आपल्या राजकीय पदाचा वापर करून त्यांनी मलकापूर परिसरात अवैध बायोडिझेलचं मोठं जाळ उभारलं आहे. या अटकेनंतर जिल्ह्यात खळबळ उडाली असून या प्रकरणात मोठं रॅकेट असण्याची शंका पोलिसांना आहे. अधिक माहितीनुसार, पोलिसांनी सैजाद खानला यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.